मॉलमध्ये गोळीबाराचं भीषण दृश्य, शाहरुख खान याच्या अभित्रीनेसोबत घडली धक्कादायक घटना

Shah Rukh Khan | मॉलमधील गोळीबाराचं भीषण दृश्य, अनेकांचा मृत्यू आणि...; मित्रांसोबत मॉलमध्ये गेलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडली अत्यंत धक्कादायक घटना... सध्या सर्वत्र अभिनेत्रीने पाहिलेल्या हृदयद्रावक घटनेची चर्चा...

मॉलमध्ये गोळीबाराचं भीषण दृश्य, शाहरुख खान याच्या अभित्रीनेसोबत घडली धक्कादायक घटना
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 10:16 AM

मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्यासोबत आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी काम केलं आहे. नुकताच ‘जवान’ सिनेमात शाहरुख खान याच्यासोबत झळकलेल्या अभिनेत्री आलिया कुरेशी (Aaliyah Qureishi) हिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. ‘जवान’ सिनेमात आलिया हिने ‘झल्ली’ या भूमिकेला न्याय दिला. आलिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री नुकताच थायलंड याठिकाणी मित्रांसोबत मॉलमध्ये गेली होती. तेव्हा अभिनेत्रीसोबत एक धक्कादायक घडना घडली. मॉलमधील गोळीबाराचं भीषण दृश्य अभिनेत्रीला मोठा धक्का बसला.

थायलंडमधील एका मॉलमध्ये 14 वर्षांच्या मुलाने गोळीबार केला. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, ‘जवान’ फेम अभिनेत्री आलिया कुरेशीही तेथे उपस्थित होती. मॉलमधील गोळीबाराचं भीषण दृश्य अभिनेत्रीने पाहिल्यामुळे तिला मोठा धक्का बसला. या घटनेतून अभिनेत्री बचावली आहे. पण आलिया हिने घडलेली घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितली आहे.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्री म्हणाली, ‘घडलेल्या घटनेवर लिहिणं फार कठीण आहे. पण इन्स्टाग्रामवर फक्त चांगल्या गोष्टी मांडायच्या नाहीत, मग त्या कितीही भयानक असुदे.. मी सियाम पॅरागॉनच्या शुटिंगसाठी थायलंडमध्ये होती. जेव्हा घटना घडली तेव्हा मी माझ्या मित्रांसोबत मॉलमध्ये होती.’

‘एस्केलेटरवरून आम्ही वर जात होतो. तेव्हा लोकांची पळापळ सुरु होती. शूटर-शूटर म्हणून लोक पळत होते. तीन गोळ्या झाडल्याचा आवाज आमच्या देखील कानावर आला. तेव्हा आम्ही जीव मुठीत घेवून तेथून पळ काढला. मला फार वाईट वाटत आहे. कारण तेव्हा निर्दोष लोकांचे प्राण गेले..’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘गोळीबारात तीन लोकांनी आपले प्राण गमावले. खरं आयुष्य देखील ऍक्शन सिनेमांप्रमाणे असतं, तर तुम्ही कधीही आणि कुठेही फिरु शकता किंवा तुम्ही सर्वांचे प्राण वाचवू शकता.’ सध्या सर्वत्र अभिनेत्रीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते कमेंट करते प्रतिक्रिया देत आहेत.

आलिया कुरेशी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.