Shah Rukh Khan लेकाला शिकवतोय खास ट्रिक्स; पण किंग खानला का आला आर्यन याचा राग? व्हिडीओ व्हायरल
शाहरुख खान आणि आर्यन खान यांचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल... अखेर मुलावर का रागावला किंग खान? दोघांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...
मुंबई | 23 जुलै 2023 : बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी सिनेमांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे शाहरुख याच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. शाहरुख कायम त्याच्या कामात व्यस्त असतो. पण किंग खान आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबासोबत वेळ व्यतीत करत असतो. शिवाय मुलांना खास सल्ले देखील देत असतो. शाहरुख आणि गौरी यांना तीन मुलं आहेत. दोन मुलं आणि एक मुलगी… शाहरुख कायम त्याच्या मुलांसोबत दिसतो. शिवाय सोशल मीडियावर देखील मुलांसोबत फोटो व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. आता देखील अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये किंग खान मुलगा आर्यन खान याला काही खास ट्रिक्स शिकवताना दिसत आहे. शाहरुख आणि आर्यन यांच्या व्हिडीओवर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. शाहरुखचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुले आर्यनच्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत..
व्हिडीओमध्ये शाहरुख खान मुलगा आर्यन खान याला फायटिंगच्या काही खास टिप्स देताना दिसत आहे. शाहरुख खान जे सांगत ते आर्यन ऐकत आहे आणि करतना दिसत आहे. आर्यन वडील शाहरुखच्या गळ्यात हात टाकतो आणि अभिनेत्याचा गळा दाबतो. अशात हळू – हळू आर्यन खान याची पकड मजबूत होते.
View this post on Instagram
शाहरुख आर्यनला सोड म्हणून सांगतो. पण आर्यन ऐकत नाही… अखेर आर्यन याने सोडल्यानंतर किंग खान रागावतो आणि म्हणतो, ‘इडियट..’ सध्या सर्वत्र शाहरुख आणि आर्यन खान यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चाहते देखील व्हिडीओ प्रतिक्रिया देत आहेत.
शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील किंग खान याला फॉलो करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील किंग खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शाहरुख देखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आस्क एसआरकेच्या माध्यमातून गप्पा मारत असतो.
शाहरुख खान लवकरच ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘पठाण’ सिनेमाच्या यशानंतर किंग खान याचा ‘जवान’ सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिनेमात अभिनेत्री दीपिका पादुकोण, नयनतारा आणि मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक देखील दिसणार आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगत आहे.