डेटिंगच्या चर्चांदरम्यान शाहरुखच्या लेकीचं बिग बींच्या नातूसोबत ‘नाईट आऊट’

अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाला डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चांदरम्यान दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहिलं गेलंय. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डेटिंगच्या चर्चांदरम्यान शाहरुखच्या लेकीचं बिग बींच्या नातूसोबत 'नाईट आऊट'
सुहाना खान, अगस्त्य नंदाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 10, 2024 | 12:40 PM

अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांनी एकत्र अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. सुहाना आणि अगस्त्यने गेल्या वर्षी ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं. मात्र चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याच्या आधीपासूनच ही जोडी चर्चेत आहे. अगस्त्य आणि सुहाना एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. याच चर्चांदरम्यान आता पुन्हा एकदा या दोघांना मुंबईत ‘नाईट आऊट’ करताना पाहिलं गेलंय. गुरुवारी पापाराझींनी सुहाना आणि अगस्त्यला रात्री उशिरा एकमेकांसोबत पाहिलं तेव्हा त्यांनी त्यांचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला.

या व्हिडीओमध्ये अगस्त्य रात्री उशिरा त्याच्या घरी जाताना दिसतोय. त्याच्यासोबत असलेली मुलगी ही दुसरी-तिसरी कोणी नसून सुहाना खान असल्याचं म्हटलं गेलंय. मात्र या व्हिडीओत सुहानाचा चेहरा स्पष्टपणे पहायला मिळत नाही. कारण ती अगस्त्यच्या मागोमाग लगेच आतमध्ये निघून जाते. अगस्त्य हा बिग बींची मुलगी श्वेता नंदा आणि निखिल नंदा यांचा मुलगा आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अगस्त्यने त्याचा 23 वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी सुहाना त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनला आवर्जून उपस्थित होती.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

‘द आर्चीज’ हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांच्यासोबतच खुशी कपूर, मिहिर अहुजा, वेदांग रैना, युवराज मेंदा आणि अदिती सैगल यांच्याही भूमिका होत्या. बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टारकिड्सच्या यादीत समाविष्ट असलेली शाहरुख खानची मुलगी सुहाना नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पापाराझींची तिच्यावर खास नजर असते. तर दुसरीकडे अगस्त्यसोबतच्या नात्यामुळेही तिने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या सेटवर अगस्त्य आणि सुहाना यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली. सेटवरही दोघं एकमेकांसोबत बराच वेळ घालवायचे. इतरांपासूनही ही गोष्ट लपली नव्हती. ख्रिसमस पार्टीच्या निमित्ताने अगस्त्यने कुटुंबीयांसमोर हे नातं ‘ऑफिशिअल’ करण्याचं ठरवलं होतं, अशीही चर्चा होती.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.