Suhana Khan | गरीब महिलेला पाहून सुहाना खानने जे केलं, ते पाहून नेटकरी करतायत कौतुकाचा वर्षाव

'शाहरुखने मुलांचं संगोपन खूप चांगल्या पद्धतीने केलंय हे दिसून येतंय', असं एकाने लिहिलं. तर 'सुहाना नम्र स्वभावाची आहे', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. 'सुहाना इतर स्टारकिड्सपेक्षा चांगली आहे', असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

Suhana Khan | गरीब महिलेला पाहून सुहाना खानने जे केलं, ते पाहून नेटकरी करतायत कौतुकाचा वर्षाव
सुहाना खानImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 12:22 PM

मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या नम्र स्वभावाबद्दल नेहमीच बोललं जातं. शाहरुखची मुलं आर्यन खान आणि सुहाना खान अनेकदा सोशल मीडियावर विविध कारणांमुळे चर्चेत असतात. आर्यन आणि सुहाना यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात. सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र त्यापूर्वीच तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. ती जिथे कुठे जाते, तिथे पापाराझी तिला फॉलो करतात. सुहानाचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखच्या लाडक्या लेकीचा दयाळू स्वभाव पहायला मिळत आहे.

सुहाना नुकतीच तिच्या आईसोबत एका कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी तिचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला. मात्र केवळ स्टाइलमुळे नाही तर आपल्या स्वभावामुळे सुहाना विशेष चर्चेत आली आहे. या कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर कारच्या दिशेने जाताना रस्त्यावर असलेल्या काही गरीब महिलांना तिने पर्समधून पैसे काढून दिले. संबंधित महिलेनं सुहानाकडे काही पैसे मागितले. त्यानंतर तिने तिच्या पर्समधून 500 रुपयांचे दोन नोट काढून दिले. सुहानाच्या या मोठेपणाचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. ‘शाहरुखने मुलांचं संगोपन खूप चांगल्या पद्धतीने केलंय हे दिसून येतंय’, असं एकाने लिहिलं. तर ‘सुहाना नम्र स्वभावाची आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘सुहाना इतर स्टारकिड्सपेक्षा चांगली आहे’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

सुहाना नुकतीच ‘मेबलिन’ या ब्युटी ब्रँडची भारतीय ॲम्बेसेडर बनली आहे. ‘द आर्चीज’ या पहिल्या चित्रपटात ती अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिने उंची, वर्ण, सुंदरता या गोष्टींमागे न धावता आपण जसे आहोत तसं स्वीकारण्याचा संदेश चाहत्यांना दिला होता. ‘सोशल मीडिया, भारतीय मॅचमेकिंग किंवा तुमचे स्वत:चे कुटुंबीय तुम्हाला हे स्वीकार करायला भाग पाडत असतील की तुम्ही 5’7 फूट उंट आणि गोरेपान नसाल तर सुंदर नाहीत, तर मला माफ करा. माझी उंची 5’3 फूट आहे, मी सावळी आहे आणि त्याबद्दल मी खूप खुश आहे. तुम्हीसुद्धा जसे आहात त्याबद्दल खुश राहा’, असं तिने म्हटलं होतं.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.