Shah Rukh Khan : पहिल्यांदा अशा परिस्थितीत दिसला शाहरुख खान; चाहते पाहातच राहिले, व्हिडीओ व्हायरल
Shah Rukh Khan | शाहरुख खान याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...; पहिल्यांदा अशा परिस्थितीत दिसला किंग खान... सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त शाहरुख खान याची चर्चा... 'पठाण' आणि 'जवान' सिनेमाच्या यशानंतर सर्वत्र किंग खान आला प्रसिद्धी झोतात...
मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : अभिनेता शाहरुख खान याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता देखील शाहरुख खान याला स्पॉट करण्यात आलं. पण सतत येत असणाऱ्या धमक्या लक्षात घेत अभिनेत्याला Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. राज्य सरकारकडून किंग खान याला Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. ‘पठाण’ आणि ‘जवान’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केल्यामुळे शाहरुख खान याला धमक्या मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या सर्वत्र शाहरुख खान याची चर्चा सुरु आहे. किंग खान याचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शहरुख खान पहिल्यांदाच त्याच्या Y+ सुरक्षा टीमसोबत मुंबईतील थिएटरमध्ये दिसला. दिग्दर्शक करण जोहर याने ‘कुछ कुछ होता है’ सिनेमाला २५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं. म्हणून राणी मुखर्जी आणि शाहरुख खान एकत्र दिसले. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान होत आहेत.
Royalty: King Sized! 👑❤️
King Khan spotted leaving his palace #Mannat to attend the KKHH event earlier ✨❤️@iamsrk#25YearsOfKKHH #ShahRukhKhan #RaniMukerji #KaranJohar pic.twitter.com/t6fZCBFnCB
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) October 15, 2023
Y+ सुरक्षा टीमसोबत पहिल्यांदा दिसला शाहरुख खान
सोशल मीडियावर शाहरुख खान याचा एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख खान Y+ सुरक्षा टीमसोबत ‘मन्नत’बाहेर पडताना दिसत आहे. अभिनेत्याच्या कारसोबत सुरक्षा टीमच्या गाड्याचा ताफा शाहरुख याच्या भोवती दिसत आहे. धमकी मिळाल्यापासून शाहरुख याच्या सुरक्षेसाठी पोलीस सतर्क असल्याचं दिसून येत आहे.
View this post on Instagram
किंग खान याला भारतभर सुरक्षा पुरवली जाईल. एवढंच नाही तर, MP-5 मशीन गन, AK-47 असॉल्ट रायफल आणि ग्लॉक पिस्तुलने अभिनेत्याची सुरक्षेची काळजी घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सुरक्षेचा खर्च खुद्द शाहरुख खान करणार आहे. शाहरुख खान याच्या दोन सिनेमांना मिळालेलं यश लक्षात घेता अभिनेत्याच्या जीवाला धोका असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.