शाहरुख खान देखील फॉलो करतो दीपिका पादुकोण हिचं स्किन केअर रुटीन ; व्हिडीओ व्हायरल

मेकअप करण्याआधी दीपिका पादुकोण काय करते, काय आहे अभिनेत्रीचं स्किन केअर रुटीन...? दीपिकाचं स्किन केअर रुटीन किंग खान देखील करतो फॉलो... तुम्हीही पाहा अभिनेत्री का दिसते सुंदर...

शाहरुख खान देखील फॉलो करतो दीपिका पादुकोण हिचं स्किन केअर रुटीन ; व्हिडीओ व्हायरल
शाहरुख खान देखील फॉलो करतो दीपिका पादुकोण हिचं स्किन केअर रुटीन ; व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 7:55 AM

Pathaan : अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) दोघे पठाण सिनेमाला मिळालेल्या यशामुळे प्रचंड आनंदी आहेत. पठाण सिनेमान फक्त भारतातच नाही तर, जगभरात नवीन विक्रम रचत आहे. सर्वत्र फक्त आणि फक्त पठाण सिनेमाची चर्चा पहायाला मिळत आहे. पठाण सिनेमा तिसऱ्या आठवड्यात देखील बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम रचताना दिसत आहे. सिनेमाने परदेशात देखील अनेक नवीन विक्रम रचले आहेत. सिनेमाने भारतात जवळपास ४५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. त्यामुळे येत्या दिवसांत सिनेमा किती रुपयांपर्यंत मजल मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, शाहरुख, दीपिका यांनी सिनेमाची खास प्रमोशन केलं नाही. पण पठाण सिनेमाच्या प्रमोशन पूर्वी दीपिकाने शाहरुखसोबत तिच्या मेकअप ब्रँडचं प्रमोशन केलं आहे. सध्या त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र दीपिका आणि शाहरुख खान यांच्या व्हिडीओची चर्चा आहे.

पठाण सिनेमाच्या प्रमोशनपूर्वी अभिनेत्री व्हिडीओमध्ये स्वतःचा स्किन केअर रुटीन दाखवत आहे. व्हिडीओमध्ये थक्क करणारी गोष्ट म्हणजे शाहरुख देखील दीपिका हिच्या सोबत स्किन केअर रुटीन फॉलो करताना दिसत आहे. दीपिका – शाहरुख यांच्या व्हिडीओवर अनेक चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

व्हिडीओमध्ये सुरुवातीला मुंबई शहराची एक झलक दाखवण्यात येत आहे. ज्यानंतर दीपिका व्हिडीओमध्ये दिसत आहे. ज्याठिकाणी दीपिका तिचं स्किन केअर रुटीन फॉलो करताना दिसत आहे. तेवढ्यात शाहरुख त्याठिकाणी येतो आणि त्यानंतर अभिनेत्री शाहरुख याला देखील स्किन केअर रुटीन फॉलो करण्यासाठी सांगते. या व्हिडीओमध्ये दीपिका स्वतःचे मेकअप ब्रँड वापरताना दिसत आहे.

शाहरुख खान याच्यासोबत व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणते, ‘माझ्या करियरच्या सुरुवात मी शाहरुख खान याच्यासोबत केली, हे काही कोणापासून लपलेलं नाही. आतापर्यंत आम्ही चार सिनेमे केले आहेत. पण तयार होणं आणि एकत्र स्किन केअर रुटीन फॉलो करणं आणखी मजेदार आहे…’ सध्या दीपिकाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शाहरुख आणि दीपिका यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. आता पठाण सिनेमाच्या यशामुळे दोघांच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आहे. एवढंच नाही तर, शाहरुख खान याचा पठाण सिनेमा प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने ‘बेशर्म रंग’ गाण्यात घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे वाद टोकाला पोहोचला होता. अनेकांनी सिनेमावर बहिष्कार टाकण्याची देखील मागणी घेतली. पण कोणत्याही सिनेमाचा पठाण सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कोणताही परिणाम झालेला नाही. सिनेमाने प्रदर्शनानंतर तीन दिवसांत अनेक रेकॉर्ड मोडले.

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....