‘हेच एखाद्या अभिनेत्रीसोबत घडलं असतं तर चाललं असतं का?’; शाहरुखच्या किसिंग व्हिडीओवर नेटकरी संतप्त

शाहरुख खानने जवळपास चार वर्षांनंतर 'पठाण' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. त्यानंतर तो राजकुमार हिरानी यांच्या 'डंकी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'हेच एखाद्या अभिनेत्रीसोबत घडलं असतं तर चाललं असतं का?'; शाहरुखच्या किसिंग व्हिडीओवर नेटकरी संतप्त
शाहरुख खान
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 6:05 PM

दुबई : बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानचे जगभरात असंख्य चाहते आहेत. सोशल मीडियाद्वारे शाहरुख नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करण्यासाठी तयार असतात. शाहरुखला नेहमीच त्याच्या नम्र स्वभावासाठी ओळखलं जातं. मंगळवारी तो दुबईतील एका कार्यक्रमात पोहोचला होता. याच कार्यक्रमातील त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुखची भेट घेण्यासाठी चाहते किती उत्सुक असतात, हे या व्हिडीओत पहायला मिळतंय. मात्र एका महिलेच्या कृत्यामुळे नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नव्हे तर काहींनी तिला थेट तुरुंगात डांबण्याची मागणी केली आहे.

या कार्यक्रमात शाहरुखने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. त्याच्यासोबत त्याचे बॉडीगार्डसुद्धा पहायला मिळत आहेत. शाहरुख जसा त्याठिकाणी पोहोचतो, तसा तो तिथे उपस्थित असलेल्यांची भेट घेतो. त्याचदरम्यान त्याच्या भोवती चाहते घोळका करतात. या घोळक्यातच उपस्थित असलेली एक महिला शाहरुखला स्वत:कडे ओढून त्याच्या गालावर किस करते. अशावेळीही शाहरुख अत्यंत शांत आणि हसताना दिसतो. त्यानंतर तो इतर पाहुण्यांसोबत सेल्फी क्लिक करतो. या व्हायरल व्हिडीओतील महिला चाहतीच्या वागणुकीवर नेटकरी नाराज झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

अनेकांनी नाराजी जाहीर करत संबंधित महिलेविरोधात तक्रार केली आहे. ‘तिला सरळ तुरुंगात टाका’, असं थेट एकाने लिहिलं. तर ‘हेच जर एखाद्या पुरुषाने माधुरी दीक्षित किंवा दुसऱ्या अभिनेत्रीसोबत केलं असतं तर? चाललं असतं का?’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. एखाद्या सेलिब्रिटीसोबत असं घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही रणबीर कपूर, आदित्य रॉय कपूर यांसारख्या अभिनेत्यांना चाहतीने बळजबरीने किस केलं होतं.

शाहरुख खानने जवळपास चार वर्षांनंतर ‘पठाण’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. त्यानंतर तो राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासोबतच त्याचा ‘जवान’ चित्रपटसुद्धा प्रदर्शित होणार आहे. सलमान खानच्या ‘टायगर 3’ या चित्रपटातही तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.