Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jawan| ‘जवान’च्या दिग्दर्शकाच्या पत्नीसोबत शाहरुखची मस्करी; भडकून नेटकरी म्हणाले ‘हे जरा अतीच झालं’

अभिनेता शाहरुख खान सध्या 'जवान' या चित्रपटामुळे यशाच्या शिखरावर आहे. मात्र या चित्रपटाचे दिग्दर्शक अटली यांच्या पत्नीसोबत केलेली मस्करी शाहरुखला चांगलीच महागात पडली आहे.

Jawan| 'जवान'च्या दिग्दर्शकाच्या पत्नीसोबत शाहरुखची मस्करी; भडकून नेटकरी म्हणाले 'हे जरा अतीच झालं'
Shah Rukh Khan, Atlee with his wifeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 12:46 PM

चेन्नई | 8 सप्टेंबर 2023 : ‘जवान’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता शाहरुख खान पुन्हा एकदा बॉलिवूडचा किंग ठरला आहे. कारण प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम रचला आहे. याचसोबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख हा ‘जवान’चा दिग्दर्शक अटलीच्या पत्नीसोबत मस्करी करताना दिसतोय. मात्र त्याचं बोलणं काही नेटकऱ्यांना पसंत पडलं नाही. त्यामुळेच शाहरुखला ट्रोल केलं जातंय. तर दुसरीकडे किंग खानचे चाहते त्याला पाठिंबा देत आहेत. सोशल मीडियावर ‘जवान’च्या ऑडिओ म्युझिक लॉन्च दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

शाहरुखची दिग्दर्शकाच्या पत्नीसोबत मस्करी

चेन्नईमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शाहरुखसोबतच दिग्दर्शक अटली आणि त्याची पत्नी प्रियासुद्धा उपस्थित होती. शाहरुख प्रियाला म्हणतो, “आपण आणखी एका बाळाला प्रोड्यूस करूयात. माझा अर्थ आहे तू आणि अटली मिळून, मी नाही.” या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय की शाहरुखचं हे वक्तव्य ऐकून प्रिया हसते. त्यानंतर पुढे किंग खान म्हणतो, “आता मी आणि अटली मिळून को- प्रोड्युस सुद्धा करू शकतो. त्यात काहीच समस्या नाही. आता आम्ही मित्र आहोत.”

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by SRK ARMY (@srk__army_)

नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोल

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवरून शाहरुखला ट्रोल केलंय. एका युजरने लिहिलं, ‘असं म्हणताना तुला लाज वाटली पाहिजे.’ तर दुसऱ्याने म्हटलंय, ‘ही तर हद्दच झाली. बॉलिवूडवालेच असं करू शकतात.’ दुसरीकडे शाहरुखचे चाहते त्याच्या मदतीला धावून आले आहेत. ‘तुम्हा लोकांनी तुमचा दृष्टीकोन बदलायला हवा, कारण शाहरुख फक्त चित्रपटाबद्दल बोलत होता,’ असा बचाव त्याच्या चाहत्यांनी केला. ‘ही फक्त चित्रपटाबद्दलची गोष्ट आहे. ती मस्करीतच घ्यावी,’ असाही सल्ला शाहरुखच्या चाहत्यांनी ट्रोलर्सना दिला.

अटली हा दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. आपल्या पहिल्याच चित्रपटातून अटलीने दमदार कामगिरी केली आहे. जवान या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशीच 75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यापैकी 65 कोटी रुपये हिंदी भाषेतून आणि पाच-पाच कोटी रुपये तमिळ आणि तेलुगू व्हर्जनमधून कमाई झाली आहे. तर जगभरात या चित्रपटाने कमाईचा 140 कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याचा अंदाज आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.