Pathaan: ‘पठाण’वर बहिष्काराची मागणी होत असतानाच शाहरुखने देशभक्तीवरून केलं खास ट्विट

भगव्या बिकिनीवरील वाद ताजा असताना शाहरुखने देशभक्तीचा का केला उल्लेख?

Pathaan: 'पठाण'वर बहिष्काराची मागणी होत असतानाच शाहरुखने देशभक्तीवरून केलं खास ट्विट
Shah Rukh Khan स्टारर पठाण सिनेमाला विरोध कायम ; सिनेमागृहात तोडफोड, पाच जणांना अटक
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 8:59 AM

मुंबई: चार वर्षांनंतर अभिनेता शाहरुख खान ‘पठाण’ या चित्रपटातून कमबॅक करतोय. त्याच्या या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र याच चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचीही मागणी होतेय. ‘बेशर्म रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोणने घातलेल्या केसरी रंगाच्या बिकिनीवरून हा वाद निर्माण झाला. भगव्या रंगाची बिकिनी घालून बोल्ड सीन्स देत सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप काही हिंदू संघटनांनी केला आहे. तर शाहरुखने ‘पठाण’ समुदायाला चुकीच्या पद्धतीने दाखविल्याचा आरोप मुस्लिम संघटनांनी केला. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाहरुखने केलेलं एक ट्विट विशेष चर्चेत आलं आहे.

शाहरुखने नुकताच ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. ‘आस्क एसआरके’ (Ask SRK) सेशनदरम्यान त्याने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यातील एका प्रश्नाचं उत्तर देताना त्याने ‘पठाण’चं कनेक्शन देशभक्तीशी जोडलं. चाहत्याने त्याचा प्रश्न नंतर डिलिट केला, मात्र त्यावरील शाहरुखचं उत्तर व्हायरल होतंय.

हे सुद्धा वाचा

‘पठाण हा सुद्धा देशभक्तीवरील चित्रपट आहे, मात्र ॲक्शनच्या दृष्टीने’, असं ट्विट शाहरुखने केलंय. यावेळी एका चाहत्याने त्याला पठाणच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी काय अंदाज आहे, असाही प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना किंग खानने लिहिलं, ‘मी भविष्यवाणी करण्याच्या बिझनेसमध्ये नाही. मी तुमचं मनोरंजन करण्याच्या आणि तुम्हाला हसविण्याच्या व्यवसायात काम करतो.’

शाहरुखचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

2018 मध्ये शाहरुखचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्याने कामातून मोठा ब्रेक घेतला. आता चार वर्षांनंतर शाहरुखचा चित्रपटा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मध्यंतरीच्या काळात तो ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झळकला होता. मात्र यात त्याची पाहुण्या कलाकाराची भूमिका होती.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.