Shah rukh Khan | शाहरुख खानने केली होती गाैरी खान हिच्यावर ‘ही’ मोठी सक्ती, थेट…
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. शाहरुख खान याने धमाकेदार पध्दतीने तब्बल चार वर्षांनंतर बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी ही नक्कीच केलीये. पठाणनंतर शाहरुख खान याने आगामी चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरूवात केलीये.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah rukh Khan) हा नेहमीच चर्चेत असणारा अभिनेता आहे. शाहरुख खान याला बाॅलिवूडचा किंग देखील म्हटले जाते. शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. शाहरुख खान याचा 2019 मध्ये झिरो हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि शाहरुख खानचा चित्रपट (Movie) फ्लाॅप गेला. झिरो हा चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. शाहरुख खान याचे चाहते सतत त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत होते. शेवटी शाहरुख खान याने धमाकेदार पध्दतीने पठाण (Pathaan) चित्रपटाच्या माध्यमातून पुनरागमन केले.
विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कमाई केली. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हाच चित्रपट ठरला. पठाण चित्रपटानंतर शाहरुख खान याने लगेचच त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरूवात केली. सुरूवातीला शाहरुख खान याच्या चित्रपटाला जोरदार विरोध करण्यात आला.
पठाण चित्रपटाच्या विरोधात सोशल मीडियावर वातावरण बघायला मिळत होते. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने मोठ्या वादाला तोंड फुटले होते. देशामध्ये अनेक ठिकाणी चित्रपटाच्या विरोधात आंदोलनेही करण्यात आली. शाहरुख खान हा नेहमीच त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतो.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्य गाैरी खान हिने मोठा खुलासा केला आहे. शाहरुख खान हा गाैरी खान हिच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडा होता. इतकेच नाही तर शाहरुख खान हा कधीच गाैरी खान हिला पांढऱ्या रंगाचे शर्ट घालू देत नव्हता. कारण पांढरा रंगाचे शर्ट ट्रांस्पेरेंट असल्याने गाैरी हिला शाहरुख खान पांढऱ्या रंगाचे शर्ट घालू देत नव्हता.
गाैरी खान ही फक्त 14 वर्षांची असतानाच शाहरुख खान हा तिच्या प्रेमामध्ये पडला. गाैरी खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वीच गाैरी खान हिने एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ गाैरी खान हिच्या आॅफिसच्या बाहेरचा होता. त्या व्हिडीओमध्ये सुहाना खान हिची जाहिरात दिसत होती. सुहाना खान ही लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.