‘व्हॅलेंटाइन डे’ला शाहरुखने गौरीला पहिलं गिफ्ट काय दिलं होतं? 34 वर्षांनंतर स्वत:च केला खुलासा

'व्हॅलेंटाइन डे'निमित्त त्याने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. 'आस्क एसआरके' या सेशन अंतर्गत चाहत्यांनी शाहरुखला विविध प्रश्नं विचारली. यादरम्यान एका चाहत्याने 'व्हॅलेंटाइन डे'चं औचित्य साधत किंग खानला खास प्रश्न विचारला.

'व्हॅलेंटाइन डे'ला शाहरुखने गौरीला पहिलं गिफ्ट काय दिलं होतं? 34 वर्षांनंतर स्वत:च केला खुलासा
Shah Rukh Khan and Gauri KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 2:01 PM

मुंबई: बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान सध्या ‘पठाण’ चित्रपटाच्या यशाचा आस्वाद घेत आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त त्याने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. ‘आस्क एसआरके’ या सेशन अंतर्गत चाहत्यांनी शाहरुखला विविध प्रश्नं विचारली. यादरम्यान एका चाहत्याने ‘व्हॅलेंटाइन डे’चं औचित्य साधत किंग खानला खास प्रश्न विचारला. ‘तू व्हॅलेंटाइन डे निमित्त गौरी मॅडमला पहिलं गिफ्ट काय दिलं होतंस’, असा प्रश्न एका युजरने विचारला. त्यावर शाहरुखनेही लगेच उत्तर दिलं.

‘माझ्या आठवणीनुसार आता तर त्या गोष्टीला जवळपास 34 वर्षे झाली आहेत. कदाचित गुलाबी रंगाचे प्लास्टिकचे इअररिंग्स (कानातले) दिले होते’, असं उत्तर शाहरुखने दिलं.

हे सुद्धा वाचा

शाहरुख आणि दीपिकाच्या ‘पठाण’च्या सेटवरील एक व्हिडीओसुद्धा नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सेटवर शाहरुखचा मुलगा अबराम पहायला मिळतोय. यावरूनही एका ट्विटर युजरने शाहरुखला प्रश्न विचारला. ‘सर सेटवर अबराम काय करतोय? तो पठाणचा सहाय्यक दिग्दर्शक आहे का’, असं मजेशीर सवाल संबंधित युजरने केला. त्यावर किंग खाननेही त्याच्या अंदाजात उत्तर दिलं. ‘हाहाहाह.. नाही तो स्टायलिस्ट आहे’, असं त्याने लिहिलं.

शाहरुख-गौरीची लव्हस्टोरी

शाहरुख खान आणि गौरीची पहिली भेट 1984 मध्ये एका कॉमन मित्राच्या पार्टीमध्ये झाली होती. त्यावेळी शाहरुख फक्त 18 वर्षांचा होता. शाहरुखने गौरीला पाहिलं आणि त्यानंतर त्याने मित्राला तिच्याबद्दल विचारलं. शाहरुखच्या मित्राने गौरीशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती तिच्या बॉयफ्रेंडची वाट पाहत असल्याचं समजलं.

गौरीने शाहरुखच्या मित्रासोबत डान्स करणं टाळण्यासाठी बॉयफ्रेंडची वाट पाहत असल्याचं खोटं सांगितलं होतं. मात्र खरंतर ती तिच्या भावाची वाट पाहत होती. नंतर गौरीशी मैत्री झाल्यानंतर शाहरुखने एकदा तिला प्रपोज केलं. मात्र कुटुंबीयांना पसंत नसल्याने गौरीने त्याला पहिल्यांदा नाकारलं होतं. रिलेशनशिपपासून ब्रेक मिळावा यासाठी ती त्याला न सांगताच मुंबईला निघून आली होती. त्याचवेळी शाहरुखसुद्धा मुंबईत आला.

मुंबईत शाहरुख आणि त्याच्या मित्रांनी गौरीचा शोध घेतला. तेव्हा अखेर समुद्रकिनारी दोघांची भेट झाली. त्यावेळी पुन्हा एकदा शाहरुखने गौरीला प्रपोज केलं होतं. मात्र दुसऱ्यांदाही तिने नकार दिला. दुसऱ्यांदा प्रपोज केल्यानंतर वर्षभराने गौरी शाहरुखकडे आली. त्यावेळी शाहरुखच्या आईचं निधन झालं होतं. अखेर 25 ऑक्टोबर 1991 रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.