शाहरुख खान याच्या बहिणीचं सौंदर्य पाहून विसराल बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल
Shah Rukh Khan : फार कमी लोकांना माहिती आणि कशी दिसते शाहरुख खान याची बहीण, किंग खान याच्या बहिणीच्या सौंदर्यापुढे माधुरी दीक्षित, जुही चावला फिक्या, पाहा व्हिडीओ, शाहरुख खान कायम त्याच्या कुटुंबामुळे असतो चर्चेत, सध्या सर्वत्र शाहरुख याच्या बहिणीची चर्चा
मुंबई | 07 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडचा किंग खान, बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने त्याच्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. शाहरुख खान कायम कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी सांगत असतो. पत्नी गौरी खान आणि लेक सुहाना खान यांच्याशिवाय शाहरुख याच्या आयुष्यात त्याच्या बहिणीचं स्थान देखील फार मोठं आहे. सध्या सोशल मीडियावर शाहरुख खान याच्या बहिणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फार कमी लोकांना शाहरुख खान याच्या बहिणीबद्दल माहिती आहे. शाहरुख याच्या चाहत्यांची संख्या जगभरात आहे, पण किंग खानची बहीण लाईमलाईट पासून कायम दूर राहते.
शाहरुख खान याच्या बहिणीचं पूर्ण नाव शहनाज लालारुख खान आहे. अनेकदा शहजान यांना भाऊ शाहरुख याच्यासोबत स्पॉट करण्यात आलं आहे. आर्यन खान जेव्हा तुरुंगातून परतला होता, तेव्हा शहजान यांना स्पॉट करण्यात आलं होतं. सध्या शहनाज यांचा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान देखील दिसत आहे.
View this post on Instagram
शहनाज दिसायला फार सुंदर आहेत. त्यांच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री देखील फिक्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि शाहरुख खान शहनाज लालारुख खान यांची चर्चा रंगली आहे.
शाहरुख याला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांंमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. 90 च्या दशकापासून अभिनेता चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. आजही चाहत्यांच्या मनात असलेली शाहरुख खान याची क्रेझ कमी झालेली नाही.
आजही मोठ्या पडद्यावर शाहरुख खान याला पाहण्यासाठी चाहते सिनेमागृहात मोठी गर्दी करतात. सध्या ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांनी सिनेमागृहात मोठी गर्दी केली होती. बॉक्स ऑफिसवर देखील किंग खान याच्या तिन्ही सिनेमांनी मोठी कमाई केली.
सोशल मीडियावर देखील शाहरुख खान कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शाहरुख खान कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. चाहते देखील अभिनेत्याच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.