‘पठाण’चा बॉक्स ऑफिस वेग मंदावला; नवव्या दिवशी सिनेमाच्या कमाईला ब्रेक

शाहरुख खान 'पठाण' सिनेमा दुसऱ्या आठवड्यात किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारणार ? नवव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सिनेमाचा वेग मंदावला... पाहा नव्या दिवशी सिनेमाने किती कोटी रुपयांचा गल्ला जमा केला.

'पठाण'चा बॉक्स ऑफिस वेग मंदावला;  नवव्या दिवशी सिनेमाच्या कमाईला ब्रेक
'पठाण'चा बॉक्स ऑफिस वेग मंदावला; नवव्या दिवशी सिनेमाच्या कमाईला ब्रेक
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 10:36 AM

Shah Rukh Khan Film Pathaan Collection Day 9 : अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. सिनेमाने पहिल्या दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली. तर तिसऱ्या दिवशी सिनेमाची कमाई फार कमी झाली. त्यानंतर शनिवार आणि रविवार असल्यामुळे सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. पण साहव्या, सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशी सिनेमाच्या कमाईला बॉक्स ऑफिसवर ब्रेक लागला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

प्रदर्शनानंतर पहिल्या दिवशी सिनेमाने ५७ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ७०.५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तिसऱ्या दिवशी मात्र सिनेमा समाधानकारक कामाई करु शकला नाही. तिसऱ्या दिवशी पठाण सिनेमाने फक्त ३९.२५ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. शनिवारी आणि रविवारी सिनेमाने क्रमशाः ५३.२५ कोटी आणि ६०.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला.

पण साहव्या, सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशी सिनेमाच्या कमाईला बॉक्स ऑफिसवर ब्रेक लागला आहे. साहव्या सिनेमाने २६.५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. सातव्या दिवशी सिनेमाने फक्त २३ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. आठव्या दिवशी सिनेमाने जवळपास १८.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आणि नवव्या दिवशी सिनेमा फक्त १५.५० कोटी रुपयांची कमाई केली.

हे सुद्धा वाचा

नव्या दिवशी पठाण सिनेमाच्या कमाईला लागलेल्या ब्रेकनंतर दुसऱ्या आठवड्याच्या शनिवार – रविवार सुट्टीच्या दिवशी सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पठाण सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर कमाईचा आकडा कमी होत असला तरी, जगभरात शाहरुख खान स्टारर पठाण सिनेमाने अनेक नवे विक्रम रचले आहेत.

सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनी साकारलेल्या भूमिकांची देखील चर्चा रंगत आहे. पठाण सिनेमात दीपिका जबरदस्त अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. शिवाय सलमान खानची एक अप्रतिम कॅमिओ भूमिका चाहत्यांच्या मनात घर करत आहे. म्हणून पुन्हा मोठ्या पडद्यावर शाहरुख आणि सलमान खान यांना पाहणं चाहत्यांसाठी खास आहे.

महत्त्वाचं शाहरुख खान याने मोठ्या पडद्यावर चार वर्षांनंतर पुन्हा पदार्पण केल्यामुळे अभिनेत्याला पाहण्यासाठी अनेक चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने ‘बेशर्म रंग’ गाण्यामध्ये घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण कोणत्याही वादाचा बॉक्स ऑफिसवर कोणताही परिणाम झाला नाही.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.