प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच शाहरुख खान स्टारर पठाण सिनेमाल मोठा झटका
आधी दीपिका पादुकोण हिच्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे तर आता या कारणामुळे शाहरुख खान स्टारर पठाण सिनेमा अडचणीत; असं काय झालं ज्यामुळे कलाकार आणि निर्माते चिंतेत?
Shah Rukh Khan Pathaan : अभिनेता शाहरुख खान , जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमामा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. पठाण सिनेमाता फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहण्यासाठी किंग खान याच्या चाहत्यांनी ॲडव्हान्स बुकिंग केली. पण प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सिनेमाला मोठा झटका लागला आहे. रिपोर्ट्सनुसार, सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. प्रदर्शनापूर्वीच सिनेमा लीक झाल्यामुळे निर्मात्यांना मोठा झटका लागण्याची शक्यता असल्याची सर्वत्र चर्चा रंगत आहे. आता पठाण सिनेमाबदद्ल अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत.
रिपोर्ट्सनुसार, तमिळ रॉकर्स, फिल्मझिला, Mp4 मूव्हीज आणि व्हेगामोव्हीज सारख्या साइट्सनी पठाण सिनेमा ऑनलाईन लीक केला आहे. या साइट्सवर सिनेमाची एचडी प्रिंट उपलब्ध आहे. याआधी देखील अनेक सिनेमे ऑनलाईल लीक झाल्यामुळे निर्मात्यांना मोठं नुकसान झालं. सिनेमा ऑनलाईन लीक झाल्यानंतर प्रेक्षक थिएटरमध्ये जाण्याची तसदी घेत नाहीत.
जर पठाण सिनेमाबद्दल देखील असं झालं, तर त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर दिसू शकतो. ट्रेड एक्स्पर्ट्स याबद्दल अनेकदा निर्मात्यांना सतर्क करताना दिसतात. याआधीही ब्रह्मास्त्र, आरआरआर, पुष्पा, गुड लक सखी, भूत पार्ट वन, शुभ मंगल ज्यादा सावधाना आणि दृश्यम 2 यांसारख्या सिनेमे लीक झाले होते.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, पठाण बुधवारी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच जवळपास ५० कोटी रुपयांच्या ॲडव्हान्स तिकीटांची विक्री केली आहे. रिपोर्टुनुसार आतापर्यंत पठाण सिनेमाचे जवळपास १३ लाख तिकीटांची विक्री झाली आहे.
मीडिया रिपोर्टने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सिनेमा प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ४० कोटी रुपयांची कमाई करु शकतो. तर शनिवार आणि रविवारी सिनेमा भारतात तब्बल १५० ते २०० कोटी रुपयांपर्यंत गल्ला गोळा करु शकतो. पठाणमुळे वाद निर्माण झाल्याने याचा फायदा हा चित्रपटालाच होताना दिसत आहे. आता भारतामध्ये काय प्रतिसाद या चित्रपटाला मिळतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे
मीडियारिपोर्ट्स नुसार, ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यावर होणारा विरोध पाहता सेंसर बोर्डाने सिनेमातील काही सिनवर कात्री चालवली असून सिनेमात महत्त्वाचे बदल केले आहेत. सिनेमा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.