Jawan | शाहरुख खान स्टारर Jawan सिनेमाचा सर्वत्र बोलबाला; कमाई थक्क करणारी

Jawan | 'जवान' सिनेमाबद्दल असलेली क्रेझ सध्या चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. 'जवान' सिनेमाने मोडले सर्व रेकॉर्ड... किंग खान याला पाहण्यासाठी चाहत्यांची चित्रपटगृहात गर्दी..

Jawan | शाहरुख खान स्टारर Jawan सिनेमाचा सर्वत्र बोलबाला; कमाई थक्क करणारी
Follow us
| Updated on: Sep 12, 2023 | 7:55 AM

मुंबई : 12 सप्टेंबर 2023 | अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमाचा सर्वत्र बोलबाला पाहायला मिळत आहे. सर्वत्र फक्त आणि फक्त ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ सिनेमाने फक्त पाच दिवसांमध्ये सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. पुढे सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चार दिवसांत सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. आता सोमवारचे आकडे समोर आले आहेत. सोमवार असून देखील ‘जवान’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली आहे. ‘जवान’ सिनेमाने पाचव्या दिवशी म्हणजे सोमवारी किती कोटी रुपयांचा गल्ला जमा केला जाणून घेवू. सध्या सर्वत्र ‘जवान’ आणि सिनेमाच्या कमाईची चर्चा रंगली आहे.

रिपोर्टनुसार, ‘जवान’ सिनेमाने प्रदर्शनानंतर पाचव्या दिवशी सिनेमाने ३० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. म्हणजे सिनेमाने आतापर्यंत पाच दिवसांत ३१६.१६ कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. आता पुढे सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘जवान’ सिनेमाच्या कमाईचे आकडे…

पहिला दिवस – ७५ कोटी

दुसरा दिवस – ५३. २३ कोटी

तिसरा दिवस – ७७.८३ कोटी

चौथा दिवस- ८२ कोटी

पाचवा दिवस – ३० कोटी

शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमाने रिलीजच्या अवघ्या पाच दिवसांत ३०० कोटींचा टप्पा पार करून नवीन इतिहास रचला आहे. यासोबतच ‘जवान’ सिनेमा २०२३ मध्ये ३०० कोटींचा टप्पा पार करणारा तिसरा बॉलिवूड सिनेमा ठरला आहे. ‘जवान’ने पहिल्या सोमवारी ‘पठाण’चा रेकॉर्ड मोडला आहे. ‘पठाण’ सिनेमाने पहिल्या सोमवारी २६.५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला होता.

यंदाच्या वर्षी २५ जानेवारी रोजी किंग खान स्टारर ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि सिनेमाने फक्त भारतात नाही तर जगभरात नवीन विक्रम रचले. ‘पठाण’ सिनेमा यशाच्या शिखरावर असताना शहरुख खान याच्या ‘जवान’ सिनेमाची चर्चा सुरु होती.

अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमात अनेक अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस आल्या आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोण, नयनतारा याच्यासोबत सान्य मल्होत्रा, गिरीजा ओक, प्रियामणी, रिद्धी डोगरा, संजीता भटाचार्य, ऋतुजा शिंदे या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. सध्या सर्वत्र ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.