Jawan | ‘जवान’ सिनेमा चित्रपटगृहात जावून पाहण्याआधी जाणून घ्या ‘या’ १० गोष्टी

Jawan | 'जवान' सिनेमा चित्रपटगृहात जावून पाहण्याआधी जाणून घ्या 'या' १० गोष्टी; दीपिका पादुकोण हिची नक्की भूमिका कोणती?... सध्या सर्वत्र 'जवान' सिनेमाची चर्चा...

Jawan | 'जवान' सिनेमा चित्रपटगृहात जावून पाहण्याआधी जाणून घ्या 'या' १० गोष्टी
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 7:35 PM

मुंबई : 9 सप्टेंबर 2023 | वर्षाच्या सुरुवातील अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शित झाला. ‘पठाण’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमा केला आणि फक्त भारतात नाही तर, जगभरात विश्वविक्रम रचला. आता किंग खान याच्या ‘जवान’ सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगत आहे. सिनेमातील ॲक्शन सीन आणि अनेक ट्विस्ट पाहण्यासाठी अनेकांनी ॲडव्हान्स बुकिंग देखील केली. सिनेमाने दोन दिवसांत १०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. शनिवार आणि रविवार असल्यामुळे सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

‘जवान’ सिनेमाबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत. सिनेमा मल्टी स्टारर असल्यामुळे चाहते चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. सध्या सर्वत्र ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. शनिवार – रविवार असल्यामुळे अनेक जण सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाणर असतील. पण सिनेमागृहात जाण्याआधी या दहा महत्त्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या…

‘जवान’ सिनेमातील दहा महत्त्वाच्या गोष्टी

1. ‘जवान’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. सिनेमाने दोन दिवसांत १०० कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. पण सिनेमातील काही हैराण करणाऱ्या गोष्टी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

2. ‘जवान’ सिनेमात सर्वात मोठी हैराण करणारी गोष्ट म्हणजे अभिनेता संजय दत्त याची पाहुण्या कलाकाराची भूमिका. सिनेमात संजूबाबा पोलीस अधिकाऱ्याच्या रुपात दिसत आहे.

3. ‘जवान’ सिनेमात अभिनेत्री दीपिका पादुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगत आहे. पण सिनेमा पाहिल्यानंतर कळत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत अभिनेत्री दिसत नसल्याचं लक्षात येत आहे.

4. सिनेमात दीपिका हिने विक्रम राठोड (शाहरुख खान) याची पत्नी ऐश्वर्या या भूमिकेत दिसत आहे. अभिनेत्री स्क्रिन टाईम अत्यंत खास आहे. ‘जवान’ सिनेमामुळे सध्या दीपिका तुफान चर्चेत आहे.

5. ‘जवान’ सिनेमात अभिनेत्री रिद्धी डोहरा शाहरुख खान याच्या आईच्या भूमिकेत दिसत आहे. रिद्धी हिची आईची भूमिका असल्यमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

6. ‘जवान’ सिनेमा पाहत असताना तुमच्या देखील डोळ्यात पाणी येईल, जेव्हा दीपिका पादुकोण हिला संपवण्यासाठी तयारी सुरु करतात. दीपिका हिच्या भूमिकेची सध्या तुफान चर्चा रंगत आहेत. दीपिका हिला पाहण्यासाठी देखील चाहते चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.

7. सिनेमात अनेक ट्विस्ट आहेत. पण होणाऱ्या वादासाठी कारणीभूत अभिनेता विजय सेतुपती म्हणजे काली गायकवाड आहे. ज्यामुळे सैनिकांचे प्राण धोक्यात येतात. सिनेमात विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे.

8. ‘जवान’ सिनेमात अभिनेता एक नाही तर दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. किंग खान अभिनेत्री नयनतारा आणि दीपिका पादुकोण यांच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

9. सिनेमात किंग खान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात अभिनेता बाप – मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. वडिलाचं नाव विक्रम राठोड आणि मुलाचं नाव आझाद आहे.

10. ‘जवान’ सिनेमात दिग्दर्शक एटली किंग खान याच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. सिनेमाच्या शेवटच्या गाण्यात दोन्ही शाहरुख खान डान्स करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.