‘पठाण’ सिनेमाने रचला अनोखा विक्रम ; ३२ वर्षांनंतर काश्मीरमध्ये घडली अशी गोष्ट

किंग खान याचं चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दणक्यात पदार्पण, पठाण सिनेमामुळे काश्मीरमध्ये अनोखा विक्रम ; ३२ वर्षांनंतर काश्मीर खोऱ्यांमध्ये असं काय घडलं ज्यामुळे अनेकांनी मानले शाहरुख खान याचे आभार...

'पठाण' सिनेमाने रचला अनोखा विक्रम ; ३२ वर्षांनंतर काश्मीरमध्ये घडली अशी गोष्ट
'पठाण' सिनेमाने रचला अनोखा विक्रम ; ३२ वर्षांनंतर काश्मीरमध्ये घडली अशी गोष्ट
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 8:02 AM

मुंबई : अभिनेता शाहरुख खान , जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमामा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खान मोठ्या पडद्यावर चार वर्षांनंतर पदार्पण करत असल्यामुळे चाहत्यांच्या उत्साह शिगेला पोहोचलेला असताना अनेक ठिकाणी सिनेमाने अनेक ठिकणी अनोखा विक्रम रचला आहे. सध्या सर्वत्र शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाची चर्चा आहे. पठाण देशभरात प्रदर्शनानंतर सिनेमा रोज नवे विक्रम रचत आहे. पठाण सिनेमाने काश्मीरमध्ये असा विक्रम रचला आहे, ज्याच्या प्रतीक्षेत खोऱ्यातील चाहते गेल्या ३२ वर्षांपासून होते.

पठाण सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदा ३२ वर्षांनंतर चित्रपटगृह प्रेक्षकांनी खच्च भरला होता. देशातील प्रसिद्ध मल्टीप्लेक्स INOX Leisure Ltd याबाबतीत ट्विट करत महत्त्वाची माहिती दिली आहे. एवढंच नाही तर, त्यांनी शाहरुख खान याचे आभार देखील मानले आहे.

INOX ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्विट करत याबाबतीत माहिती दिली आहे. ट्विट करत ते म्हणाले, ‘पठाण सिनेमाची संपूर्ण देशात असलेली क्रेझ पाहायला मिळत आहे. ३२ वर्षांनंतर काश्मीर खोऱ्यांमध्ये हाऊस फुल साईन पुन्हा आणल्यामुळे किंग खानचे आभारी… धन्यवाद शाहरुख खान…’ सध्या INOX ने केलेलं ट्विट सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.

सध्या सर्वत्र पठाण सिनेमाची जादू पाहायला मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी देखील अनेक संघटनांनी सिनेमाचा विरोध केला. पण त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर झालेला नाही. शाहरुख खान याने चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्यामुळे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे विकेंडला सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जगभरातून ओपनिंग डेला साधारण १०० कोटींची कमाई पठाण चित्रपटाने केली आहे. पुढील काही दिवस पठाण चित्रपट धमाकेदार कमाई करू शकतो. आजही चित्रपटाचे अनेक शो हे हाऊसफुल झाल्याचे बघायला मिळाले. शिवाय अनेक सेलिब्रिटी पठाण आणि सिनेमातील कलाकारांचे कौतुक करत आहेत.

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.