‘हव्या तेवढ्या तरुणींना डेट कर आणि…’, अशा कामांसाठी गौरी खान हिचा मुलगा आर्यन खान याला पाठिंबा

Shah RuKh Khan : गौरी खान हिचा मुलगा आर्यन खान याला पूर्णपणे पाठिंबा... शाहरुख खान याची पत्नी म्हणाली, 'हव्या तेवढ्या तरुणींना डेट कर आणि...', गौरी खान कायम पती किंग खान आणि मुलांबद्दल वक्तव्य करत असते... आता देखील गौरी हिने मुलाच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

'हव्या तेवढ्या तरुणींना डेट कर आणि...', अशा कामांसाठी गौरी खान हिचा मुलगा आर्यन खान याला पाठिंबा
Follow us
| Updated on: Dec 19, 2023 | 1:53 PM

मुंबई | 19 डिसेंबर 2023 : अभिनेता शाहरुख खान याचं कुटुंब कायम चर्चेत असतं. शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान देखील मुलांबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात. शिवाय गौरी मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण आता शाहरुख खान याने नाही पत्नी गौरी खान हिने मुलगा आर्यन खान याच्या खासगी आयुष्याचा मोठा खुलासा केला आहे. गौरी खान हिने मुलाबद्दल केलेलं वक्तव्य चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत गौरी हिने मुलाच्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा केला आहे. गौरी खान हिने केलेलं वक्तव्य आर्यन खान याच्यासाठी मोठा सल्ला आहे.

काही दिवसांपूर्वी गौरी खान बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आली होती. यावेळी करण याने गौरी हिला एक प्रश्न विचारला. ‘आर्यन याला रिलेशनशिपबद्दल सल्ला द्यायचा असेल, तर तो सल्ला कोणता असले…’ यावर गौरी हिने केलेलं वक्तव्य तुफान चर्चेत आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

करण जोहर याच्या प्रश्नाचं उत्तर देत किंग खान याची पत्नी गौरी खान म्हणाली, ‘तुला हव्या तेवढ्या तरुणींना डेट कर. पण जेव्हा लग्न करण्याची वेळ येईल तेव्हा एका मुलीची निवड कर आणि लग्न झाल्यानंतर इतर कोणत्याही रिलेशनशिपवर पूर्णविराम लावायचा…’ असा सल्ला गौरी हिने मुलगा आर्यन खान याला दिला आहे.

आर्यन खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, आर्यन खान याने अद्याप अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेलं नाही, तरी देखील आर्यन खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील आर्यन खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. एवढंच नाही तर, आर्यन याची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. किंग खान याचा मुलगा असल्यामुळे आर्यन खान याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

आर्यन खान याच्या नावाची चर्चा अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत झाली. पण आर्यन याने कोणत्याच नात्यावर अधिकृत वक्तव्य केलं नाही. आर्यन खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर देखील आर्यन खान याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सर्वत्र आर्यन खान याची चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.