Shahid Kapoor | ‘८ वर्षांच्या संघर्षानंतर अखेर…’, शाहिद कपूरकडून वैवाहिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा

'मीरा प्रचंड कठोर आहे, ज्यामुळे...', लग्नाला आठ वर्ष झाल्यानंतर पत्नीबद्दल असं का म्हणाला शाहिद कपूर? सर्वत्र अभिनेत्याच्या वैवाहिक आयुष्याची चर्चा...

Shahid Kapoor | '८ वर्षांच्या संघर्षानंतर अखेर...', शाहिद कपूरकडून वैवाहिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 1:01 PM

मुंबई : अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि पत्नी मीरा राजपूत (Mira rajput) कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. दोघांची जोडी बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी एक आहे. एवढंच नाही तर, दोघे एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना देखील दिसतात. शाहिद आणि मीरा यांच्या लग्नाला जवळपास ८ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण आजही दोघे पती-पत्नीच्या नात्यामध्ये एकमेकांचा आदर करतात. शाहिद कायम अनेक मुलाखतींमध्ये मीरा आणि त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगत असतो. आता देखील लग्नाच्या आठ वर्षांनंतर शाहिदने त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल मोठं रहस्य चाहत्यांना सांगितलं आहे. शिवाय मुलांबद्दल देखील अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र शाहिद आणि अभिनेत्याच्या वैवाहिक आयुष्याची चर्चा रंगत आहे..

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने लग्नानंतर आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे. शिवाय पत्नी मीरा हिच्यावर असलेल्या प्रेमाबद्दल देखील अभिनेत्याने मौन सोडलं आहे. ‘दिवसागणिक मीरावर असलेलं माझं प्रेम वाढत आहे…’ असं अभिनेता म्हणाला. शिवाय मीरा आयुष्यात आल्यामुळे संपूर्ण आयुष्य बदललं आहे… असं देखील अभिनेता मुलाखतीत म्हणाला…

वैवाहिक आयुष्याबद्दल शाहिद म्हणाला की, मी आता एक गोष्टीचा स्वीकार केला आहे आणि ती गोष्ट म्हणजे, लग्नानंतर तुमचा दृष्टीकोण कायम योग्य नसतो. आपल्याकडून चुका झाल्या आहेत आणि तुम्हाला गोष्टी बदलायच्या आहेत.. लग्न माणसाला जाणीव करून देतं की तो सामान्य आहे.. असं शाहिद लग्नाबद्दल म्हणाला…

हे सुद्धा वाचा

‘लग्नानंतर सुरुवातीला काही गोष्टींसाठी मी मीराला नाही म्हणायचो.. पण आता काही बोलू शकत नाही… होकारच द्यावा लागतो.. लग्नाच्या आठ वर्षांच्या संघर्षानंतर मला कळाल आहे, जी लढाई तुम्ही जिंकू शकत नाही.. ती लढाई न लढलेलीच बरी… कारण पत्नी कायम योग्यच असते…’ असं देखील विनोदी अंदाजात अभिनेता म्हणाला..

पुढे अभिनेता म्हणाला, ‘जोडीदाराचा दृष्टीकोन नेहमीच योग्य नसतो, परंतु अनेक यशस्वी पुरुषांना हे सत्य स्वीकारण्यास त्रास होतो. त्यांना वाटतं की ते नेहमीच बरोबर असतात, परंतु हे सत्य नाही. मीराची एक गोष्ट प्रचंड चांगली आहे आणि ती म्हणजे तिला काय करायचं हे माहिती असतं… कपल म्हणून दोघांनी एकमेकांच्या विचारांचा आदर करायला हवा..

मीरा कायम प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असते.. मुलांसाठी ती प्रचंड कठोर आहे, कारण तिला माहिती आहे त्यांच्यासाठी कोणत्या गोष्टी योग्य आहेत. शाहिद कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. शिवाय आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत अभिनेता कुटुंबासोबत वेळ व्यतीत करत असतो..

नुकताच अभिनेता शाहिद कपूर वेब सीरिज फर्जीमध्ये दिसला होता. यानंतर तो लवकरच ‘ब्लडी डॅडी’ सिनेमाच्या माध्यमाातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाच अभिनेता थ्रिलर स्टाईलमध्ये दिसणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.