Shahid Kapoor | शाहिद कपूर याने केला बाॅलिवूड चित्रपट निर्मात्यांबद्दल मोठा खुलासा, चाहते हैराण
बाॅलिवूड अभिनेता शाहिद कपूर याने आतापर्यंतच्या करिअरमध्ये हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. शाहिद कपूर या नेहमीच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. शाहिद कपूर याने नुकताच एक अत्यंत मोठा खुलासा हा केला आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच शाहिद कपूर याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. शाहिद कपूर याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ही खास पोस्ट शेअर केली होती. शाहिद कपूर हा फक्त आपल्या चित्रपटांमुळेच (Movie) नाही तर आपल्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतो. शाहिद कपूर याने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाहिद कपूर याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही सोशल मीडियावर बघायला मिळते. शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत हे नुकताच वरळीमध्ये नव्या आलिशान घरात शिफ्ट झाले आहेत.
शाहिद कपूर याने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये सध्या शाहिद कपूर हा प्रचंड चर्चेत आलाय. सुरूवातीला एक हिट चित्रपट देऊनही आपल्याला चित्रपटामध्ये घेतले जात नसल्याचे सांगताना शाहिद कपूर हा दिसला. इतकेच नाही तर चित्रपटामध्ये आपल्याला न घेण्याचे कारणही शाहिद कपूर याने सांगून टाकले आहे.
शाहिद कपूर म्हणाला की, निर्मात्यांना हा प्रश्न कायमच पडायचा की, माझ्यासोबत चित्रपटामध्ये कोणत्या अभिनेत्रीला घ्यायला हवे. कारण मी खूपच वयाने लहान दिसत होतो आणि अभिनेत्री या माझ्यापेक्षा मोठ्या दिसत होत्या. अनेक निर्माते मला चाॅकलेट बाॅय देखील म्हणायचे. चित्रपट निर्मात्यांना अभिनेत्रीच्या वयासारखे दिसणारे अभिनेते हवे होते.
शाहिद कपूर पुढे म्हणाला की, यामुळे माझ्या हातामधून अनेक चित्रपट गेले. बरेच निर्माते मला थेट म्हणाले होते की, तू चित्रपटामध्ये एकदम लहान मुलगा दिसशील. 2003 मध्ये शाहिद कपूर याने इश्क विश्क या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. शाहिद पुढे म्हणाला की, कोणताही अभिनेता ज्यावेळी कमी वयात पर्दापण करतो त्यावेळी त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
मीरा राजपूत हिने काही दिवसांपूर्वी वरळीमधील घराचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले होते. कोट्यावधीच्या आसपास मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांचे वरळीमधील घर आहे. मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांच्या लग्नाला तब्बल 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. मीरा राजपूत हिची देखील सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांना दोन मुले आहेत.