AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahid Kareena | लग्नाच्या 8 वर्षांनंतर शाहिद कपूरने एक्स गर्लफ्रेंड करीनाविषयी केलं वक्तव्य; म्हणाला..

बॉलिवूड इंडस्ट्रीत एकेकाळी शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या लव्हस्टोरीची जोरदार चर्चा होती. हे दोघं जवळपास तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. 2004 मध्ये ‘फिदा’ या चित्रपटाच्या सेटवर करीना शाहिदला पहिल्यांदा भेटली होती.

Shahid Kareena | लग्नाच्या 8 वर्षांनंतर शाहिद कपूरने  एक्स गर्लफ्रेंड करीनाविषयी केलं वक्तव्य; म्हणाला..
Shahid Kapoor and Kareena Kapoor KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 06, 2023 | 3:04 PM
Share

मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे इंडस्ट्रीतील ‘पॉवर कपल’ म्हणून ओळखले जातात. यांचं अरेंज मॅरेज असून दोघांमधील प्रेम, समजूतदारपणा आणि खास कनेक्शन पाहून चाहतेही कौतुकाचा वर्षाव करतात. मीरा ही फिल्म इंडस्ट्रीतील नसूनही सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्याशी लग्न करण्यापूर्वी शाहिदचं अभिनेत्री करीना कपूर खानशी अफेअर होतं. या दोघांच्या अफेअरची चर्चा संपूर्ण इंडस्ट्रीत होती. मात्र आता दोघंही आपापल्या वैवाहिक आयुष्यात पुढे गेले आहेत. आता लग्नाच्या आठ वर्षांनंतर शाहिदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीना कपूरविषयी वक्तव्य केलं आहे. एक्स गर्लफ्रेंडमध्ये कोणती खास गोष्ट होती, याविषयी त्याने उत्तर दिलं आहे.

करीना कपूरच्या एखाद्या खास गुणाबद्दल शाहिदला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “मला तिचा सुपरस्टारवाला अंदाज फार आवडतो. करीनाने करिअरच्या सुरुवातीपासूनच सुपरस्टारचा अप्रोच ठेवला होता आणि अगदी पहिल्या चित्रपटातसुद्धा तिचा हाच अंदाज होता.” शाहिद आणि करीनाने फिदा, चुप चुप के, जब वी मेट आणि उडता पंजाब यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.

‘टशन’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीना सैफ अली खानच्या प्रेमात पडली. या मुलाखतीत शाहिदला सैफविषयीही एक प्रश्न विचारण्यात आला. करीनाचा पती सैफशी भेट झाली तर तू एक अशी गोष्ट काय करशील, असं त्याला विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला, “मी त्याला ‘हाय’ असं बोलेन.” 2017 मध्ये ‘रंगून’ या चित्रपटाचं शूटिंग करताना दोघं एकाच जिममध्ये जायचे, असंही शाहिदने सांगितलं.

बॉलिवूड इंडस्ट्रीत एकेकाळी शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या लव्हस्टोरीची जोरदार चर्चा होती. हे दोघं जवळपास तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. 2004 मध्ये ‘फिदा’ या चित्रपटाच्या सेटवर करीना शाहिदला पहिल्यांदा भेटली होती. पहिल्याच भेटीत तिला शाहिद आवडला होता. या भेटीनंतर लगेचच दोघं एकमेकांना डेट करू लागले होते. खुद्द करीनाने एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की तिने शाहिदला अनेकदा मेसेज आणि फोन केले होते. त्यानंतर त्याने तिच्या प्रपोजलचा स्वीकार केला होता.

‘ओमकारा’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीनाने सैफ अली खानसमोरच शाहिदला किस केल्याचं म्हटलं जातं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. शाहिदने 2015 मध्ये मीरा राजपूतशी लग्न केलं. मीरा ही शाहिदपेक्षा 13 वर्षांनी लहान आहे. लग्नाच्या वेळी ती 21 वर्षांची होती. या दोघांना दोन मुलं आहेत.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.