Shahrukh Khan याच्या जीवाला धोका, सतत येत असलेल्या धमक्यांमुळे सरकारने उचललं मोठं पाऊल

Shahrukh Khan | अभिनेता शाहरुख खान याच्या जीवाला धोका.. अभिनेत्याच्या सुरक्षेसाठी सरकारने उचललं मोठं पाऊल, किंग खान याचे चाहते चिंतेत... सध्या सर्वत्र किंग खान याची चर्चा... किंग खान याच्या कुटुंबासाठी घेतण्यात आला मोठा निर्णय...

Shahrukh Khan याच्या जीवाला धोका, सतत येत असलेल्या धमक्यांमुळे सरकारने उचललं मोठं पाऊल
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 9:33 AM

मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : अभिनेता शाहरुख खान याला सतत धमक्या येत असल्यामुळे सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. सतत येत असणाऱ्या धमक्या लक्षात घेत अभिनेत्याला Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. राज्य सरकारकडून किंग खान याला Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. ‘पठाण’ आणि ‘जवान’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केल्यामुळे शाहरुख खान याला धमक्या मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारकडून तैनात असलेले 6 पोलीस कमांडो शाहरुख खान याच्या सुरक्षेसाठी कायम असतील.

किंग खान याला भारतभर सुरक्षा पुरवली जाईल. एवढंच नाही तर, MP-5 मशीन गन, AK-47 असॉल्ट रायफल आणि ग्लॉक पिस्तुलने अभिनेत्याची सुरक्षेची काळजी घेण्यात येणार आहे. तसंच अभिनेत्याच्या राहत्या घरी देखील चार पोलीस तैनात असतील. अशी देखील माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सुरक्षेचा खर्च खुद्द शाहरुख खान करणार आहे. शाहरुख खान याच्या दोन सिनेमांना मिळालेलं यश लक्षात घेता अभिनेत्याच्या जीवाला धोका असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र शाहरुख खान आणि अभिनेत्याच्या सुरक्षेची चर्चा रंगली आहे. अभिनेत्याला मिळत असलेल्या धमक्यांमुळे चाहते देखील चिंतेत आहेत..

हे सुद्धा वाचा

आयजीपी, व्हीआयपी सुरक्षा दिलीप सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान याच्या जीवाला धोका आहे. त्याच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेत अभिनेत्याला एस्कॉर्ट स्केलसह Y+ सुरक्षा प्रदान करावी अशी सर्व युनिट कमांडर्सना विनंती करण्यात आली आहे..’

अभिनेता सलमान खान याला देखील मिळाली Y+ सुरक्षा

अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर भाईजानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती. अभिनेत्याला राज्य सरकारकडून Y+ सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. याशिवाय खुद्द भाईजानने स्वतःसाठी बुलेटप्रुफ गाडी खरेदी केली आहे.

एवढंच नाही तर, अभिनेत्री कंगना रनौत हिला देखील Y+ सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. कंगना देखील तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. ज्यामुळे अभिनेत्रीला अनेकदा अडचणींचा सामना करावा लगाला आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....