Shah Rukh Khan: 200 कोटींचा बंगला, 14 कोटींची कार.. वाचून वाचून थकाल पण यादी संपणार नाही इतकी आहे शाहरुखची प्रॉपर्टी

शाहरुख खानचा मुंबईतील वांद्रे येथे असलेला 'मन्नत' हा आलिशान बंगला. हा बंगला एखाद्या राजमहलापेक्षा कमी नाही. त्याच्या चाहत्यांमध्ये हा बंगला खूपच फेमस आहे. अनेक चाहते मन्नत बाहेर उभं राहून फोटो देखील काढतात. वास्तुविशारद-डिझायनर कैफ फकीह यांच्या सहकार्याने गौरी खानने स्वतः मन्नतचे डिजाईन तयार केले. सी व्ह्यूव असलेला हा बंगला सर्व लक्झरी सोई सुविधांनी सुसज्ज आहेत. शाहरुखच्या मन्नत बंगल्याची तुलना अंबानींच्या घराशी केली जाते.

Shah Rukh Khan: 200 कोटींचा बंगला, 14 कोटींची कार.. वाचून वाचून थकाल पण यादी संपणार नाही इतकी आहे शाहरुखची प्रॉपर्टी
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 8:26 AM

बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान नुसता नावानेच किंग नाही तर संपत्तीच्या बाबतीतही तो किंग म्हणावा असाच आहे. शाहरुखला त्याच्या पहिल्या परफॉर्मन्ससाठी फक्त 50 रुपये मिळाले, आता त्याची एकूण संपत्ती 5 हजार कोटी इतकी आहे. बॉलीवूड स्टार्समध्ये शाहरुखच्या लक्झरी लाईफला तोड नाही. मुंबईत 200 कोटींचा बंगला, 14 कोटींची कार, 2 कोटींचे घड्याळ, लोखोंचे शूज, लंडन, दुबईमध्ये बंगले वाचून वाचून थकून जाल पण यादी संपणार नाही इतकी प्रॉपर्टी आहे शाहरुख खानकडे. शाहरुख खान हा बॉलीवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे. याशिवाय प्रोडक्शन हाऊस, IPL क्रिकेट टीम अशा विविध माध्यमातून देखील शाहरुख कोट्यावधीची कमाई करत आहे.

मुंबईत 200 कोटींचा ‘मन्नत’चा बंगला

शाहरुख खानचा मुंबईतील वांद्रे येथे असलेला ‘मन्नत’ हा आलिशान बंगला. हा बंगला एखाद्या राजमहलापेक्षा कमी नाही. त्याच्या चाहत्यांमध्ये हा बंगला खूपच फेमस आहे. अनेक चाहते मन्नत बाहेर उभं राहून फोटो देखील काढतात. वास्तुविशारद-डिझायनर कैफ फकीह यांच्या सहकार्याने गौरी खानने स्वतः मन्नतचे डिजाईन तयार केले. सी व्ह्यूव असलेला हा बंगला सर्व लक्झरी सोई सुविधांनी सुसज्ज आहेत. शाहरुखच्या मन्नत बंगल्याची तुलना अंबानींच्या घराशी केली जाते.

या बंगल्यात अनेक बेडरूम, लिव्हिंग एरिया, जिम, वॉक इन वॉर्डरोब, लायब्ररी आणि पर्सनल हॉल देखील आहे. शाहरुखने 2001 मध्ये जेव्हा हा बंगला विकत घेतले तेव्हा त्याची किंमत 14 कोटी रुपये होती. आज 2022 मध्ये या बंगल्याची किंमत 200 कोटी इतकी झाली आहे. जेव्हा शाहरुखने हा बंगला खरेदी केला तेव्हा त्याचे नाव ‘विला व्हिएन्ना’ होते आणि त्याचे मालक गुजरातचे पारसी किकू गांधी होते.

लंडन आणि दुबईमध्येही शाहरुखच्या लक्झरी प्रॉपर्टी

खाहरुख खान अनेक बंगल्यांचा मालक आहे. शाहरुखचे लंडनमध्येही एक अतिशय आलिशान बंगला आहे. 2009 मध्ये त्याने हा बंगला खरेदी केला होता. या बंगल्याची किंमत अंदाजे 172 कोटी रुपये आहे. त्याच बरोबर दुबईतील पाम जुमेराह येथे त्यांचा एक लक्झरी व्हिला देखील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्हिलाची किंमत 100 कोटी रुपये आहे. आणि या व्हिलाचं नाव जन्नत आहे. सप्टेंबर 2007 मध्ये दुबईस्थित प्रॉपर्टी डेव्हलपर नखील यांनी हा व्हिला शाहरुखला भेट म्हणून दिला होता.

शाहरुखकडे बुगाटीच्या कारचे कलेक्शन

  1. शाहरुख आलिशान कार्सचा शौकीन आहे. बुगाटी वेरॉन टॉप मॉडेलचा शाहरुख मालक आहे. याची किंमत 14 कोटी रुपये आहे.
  2. 4.1 कोटी रुपयांची रोल्स रॉयस कूप
  3. 4 कोटी रुपयांची बेंटले कॉन्टिनेंटल जीटी
  4. मर्सिडीज बेंझ एस 600 गार्ड 2.8 कोटी रुपये
  5. 56 लाख रुपयांची Audi A6
  6. 1.3 कोटी रुपयांची BMW 6 मालिका
  7. BMW 7 सिरीजची किंमत 2 कोटी रुपये आहे

शाहरुखकडे आहे 4 कोटींची लक्झरी व्हॅनिटी व्हॅन

शाहरुखची व्हॅनिटी व्हॅन ही एखाद्या आलिशान महालाला तोड देईल अशीच आहे. शाहरुख शूटिंग करत असताना ज्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये राहतो ती व्हॉल्वो BR9 मॉडेल आहे. जी खास शाहरुखसाठी प्रसिद्ध व्हॅन डिझायनर दिलीप छाब्रिया यांनी डिझाइन केली आहे. शाहरुख व्यतिरिक्त दिलीपने अनेक बॉलिवूड आणि साऊथ स्टार्सच्या व्हॅनिटी व्हॅन्स डिझाईन केल्या आहेत. या व्हॅनिटी व्हॅनचे इंटिरिअर जबरदस्त आहे. या व्हॅनचा फ्लोअर पूर्णपणे काचेचा आहे. ‘आय पॅड’वरून ही व्हॅन चालवता येणार आहे. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये पॅन्ट्री विभाग, वॉर्डरोब विभाग, एक विशेष मेकअप चेअर आणि स्वतंत्र क्यूबिकल टॉयलेट आहे. या व्हॅनिटी व्हॅनची किंमत 4 कोटी रुपये आहे.

शाहरुखच्या हातात दोन कोटींचे घड्याळ

  1. Patek Philippe Aquanaut 5968A – किंमत २ कोटी
  2. ऑडेमार्स पिगेट रॉयल ओक ऑफशोर क्रोनोग्राफ – किंमत 39 लाख
  3. रोलेक्स कॉस्मोग्राफ डेटोनाची किंमत 26 लाख रुपये आहे
  4. की टॅग ह्युअर मोनॅको 69 – 5 लाख 61 हजार

अभिनयाव्यतिरिक्त शाहरुखची अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक

रेड चिलीज एंटरटेनमेंट- 2002 मध्ये शाहरुख आणि गौरी खान यांनी मिळून ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ या प्रॉडक्शन हाऊस सुरु केले. VFX आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाउस फेमस आहे. शाहरुखच्या या बिझनेसची उलाढाल सुमारे 500 कोटी आहे.

कोलकाता नाईट रायडर्स- आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्समध्ये शाहरुख खानची कोणतीही वैयक्तिक भागीदारी नाही. त्याऐवजी, त्याच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटची टीममध्ये 55 टक्के भागीदारी आहे. प्रायोजकांना KKR च्या जर्सीच्या मागील बाजूस त्यांचा लोगो ठेवण्यासाठी 10 ते 12 कोटी रुपये आणि पुढच्या बाजूला 8 ते 22 कोटी रुपये खर्च करावे लागतात.

किडझानिया- किडझानियाच्या भारतीय फ्रेंचाइजी मध्ये शाहरुखची 26 टक्के हिस्सेदारी आहे. KidZania ही कौटुंबिक मनोरंजन आणि इनडोअर पार्कची साखळी आहे. विविध अॅक्टीव्हीटीच्या माध्यमातून KidZania 5-13 वर्षे वयोगटातील लहान मुलांना अनेक गोष्टी शिकवल्या जातात.

ब्रँड एंडोर्समेंट- ब्रँड्समधून पैसे कमवणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत शाहरुखचे नाव खाली असले तरी तरीही ब्रँड्समधून तो भरपूर पैसे कमावतो. अनेक वर्षांपासून तो पेप्सी, व्हर्लपूल, नोकिया, ह्युंदाई, टॅग ह्युअर, डिश टीव्ही, बिग बास्केट आणि बायजूचे प्रमोशन करत आहे. बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, शाहरुख एका जाहिरात शूटसाठी दररोज सुमारे 3.5 ते 4 कोटी रुपये घेतो.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.