Shahrukh Khan | शाहरुख खानच्या आगामी ‘लव्ह हॉस्टेल’मध्ये सान्या मल्होत्रा, विक्रांत मेस्सी झळकणार!

शाहरुख खानची रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि दृशयम फिल्म्स एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘लव हॉस्टेल’ असे ठेवण्यात आले आहे.

Shahrukh Khan | शाहरुख खानच्या आगामी 'लव्ह हॉस्टेल'मध्ये सान्या मल्होत्रा, विक्रांत मेस्सी झळकणार!
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 7:21 PM

मुंबई : शाहरुख खानची रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि दृश्यम फिल्म्स एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘लव्ह हॉस्टेल’ असे ठेवण्यात आले आहे. शंकर रमन हे या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात सान्या मल्होत्रा, विक्रांत मेस्सी आणि बॉबी देओल दिसणार आहेत.( Shahrukh Khan red chilies new movie Love Hostel) चित्रपटाची कथा काय आहे उत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर आधारित ही कथा आहे. या चित्रपटाची कथा एका तरुण जोडप्याच्या अस्थिर प्रवासाविषयी आहे. या तरूण जोडप्याची आयुष्य जगण्यासाठीची धडपड सुरू आहे. प्रेम, मनोरंजन,गुन्हेगारी-थ्रिलर आदी मसाला या चित्रपटात आहे. शंकर रमन हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर असून, त्यांनी यापूर्वी ‘गुडगाव’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘चित्रपटात ‘लव्ह हॉस्टेल’ हा केवळ आपल्या समाजाचाच नाही, तर आपल्या समस्या सोडविण्यावर प्रकाश टाकतो’, असे शंकर रमन म्हणाले.

‘लव्ह हॉस्टेल’ हा चित्रपट गौरी खान, मनीष मुंद्रा आणि गौरव वर्मा निर्मित करणार आहेत. रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि दृश्यम फिल्म्स अंतर्गत हा चित्रपट तयार होणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षाच्या सुरूवातीस सुरू होईल आणि त्याच वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून किंग खान मोठ्या पडद्यापासून दूर असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांशी नेहमी कनेक्ट असतो. शाहरुखने #AskSRK कार्यक्रमातून त्याच्या एका चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. या उत्तरानंतर शाहरुखचं ट्वीट माध्यमांमध्ये व्हायरल झालं आहे. यावेळी शाहरुख खान तुम्ही मन्नत विकत आहात का असा प्रश्न एका चाहत्याने शाहरुखला विचार त्याचं खास शब्दात शाहरुखनं उत्तर दिलं आहे.या प्रश्नाचं शाहरुखने अगदी भावनिक उत्तर दिलं आहे. शाहरुखने लिहलें की, “भाई मन्नत विकली जात नाही. डोके टेकवून मागितली जाते आहे. लक्षात ठेवाल तर आयुष्यात काहीतरी मिळू शकेल.” खंरतरं, शाहरुख खानच्या गप्पांच्या एका शोमध्ये त्याच्या चाहत्याने मन्नत विकत आहात का, असा प्रश्न विचारला. त्यावर शाहरुखने असं उत्तर दिलं आहे. शाहरुखच्या या ट्वीटला त्याच्या असंख्य चाहत्यांनी लाईक आणि शेअर केलं आहे. या शोमध्ये शाहरुख त्याच्या चाहत्यांशी गप्पा मारत त्यांच्या प्रश्नांची उत्तर देतो. यामध्ये मी सध्या मुलांसोबत खेळतो, आयपीएल पाहत दिवस घालवतो असंही त्याने म्हटलं आहे. IPL मध्ये कोलकाता नाइट रायडर्स ही शाहरुखची टीम आहे. त्यामुळे संपूर्ण दिवस मॅच पाहण्यात जातो असं शाहरुखनं म्हटलं आहे.

संबंंधित बातम्या : 

Shahrukh Khan | शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यावर प्लास्टिक कव्हर, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

VIDEO : शाहरुख खानच्या मुलीची एण्ट्री, पहिली शॉर्ट फिल्म प्रदर्शित

( Shahrukh Khan red chilies new movie love hostel)

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.