शाहरुख खान पुढे कार्तिक आर्यन, अक्षय कुमार फेल, चाहत्यांच्या मनात आजही ‘पठाण’

कार्तिक आर्यन, अक्षय कुमार यांना देखील किंग खान याने टाकलं मागे; 'पठाण' सिनेमाने प्रदर्शनानंतर ३१ व्या दिवशी रचला नवा विक्रम... शाहरुख बॉक्स ऑफिसचा 'बादशहा'

शाहरुख खान पुढे कार्तिक आर्यन, अक्षय कुमार फेल, चाहत्यांच्या मनात आजही 'पठाण'
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 10:39 AM

Pathaan Box Office Collection Day 31 : अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan), जॉन अब्राहम (John Abraham) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) स्टारर ‘पठाण’ (pathaan) सिनेमा २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. पण आजही सिनेमाची जादू बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. किंग खान याच्या ‘पठाण’ सिनेमाने जगभरात १ हजार कोटी, तर भारतात सिनेमाने ५०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. प्रदर्शनानंतर चौथा आठवडा देखील सिनेमासाठी लाभदायक ठरला आहे. गेल्या महिन्यापासून ‘पठाण’ सिनेमा नवे विक्रम रचताना दिसत आहे. पण नुकताच प्रदर्शित झालेल्या सिनेमांना मात्र अपयशाचा सामना करावा लागत आहे. अभिनेका कार्तिक आर्यन स्टारर ‘शहजादा’ (shehzada) आणि अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘सेल्फी’ (selfiee) सिनेमा चाहत्यांचं मनोरंजन करण्यात अपयशी ठरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आणि विश्लेषकांच्या अंदाजानुसार ‘पठाण’ सिनेमाने चौथ्या आठवड्यात जवळपास १३.९५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. चौथा आठवडा सिनेमासाठी महत्त्वाचा ठरला आहे. सिनेमाने शुक्रवारी १ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. अशात सिनेमाने प्रदर्शनानंतर ३१ दिवसांमध्ये ५२१.१६ कोटी रुपयांचा आकडा पार केल्याचं सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

तर जगभरातील ‘पठाण’ सिनेमाच्या कमाईबद्दल सांगायचं झालं सिनेमाने १०१० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सिनेमाला चाहत्यांकडून मिळणारं प्रेम पाहता, पाचव्या आठवड्याच्या शनिवारी – रविवारी सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र किंग खान आणि ‘पठाण’ सिनेमाची चर्चा आहे. (Pathaan Box Office Collection Day 31)

२५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये साकारण्यात आलेला ‘पठाण’ सिनेमा आज नवीन विक्रम रचताना दिसत आहे. सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. ज्यामध्ये शाहरुख, जॉन, दीपिका यांच्यासोबत डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी देखील मुख्या भूमिका साकारली आहे. तर अभिनेता सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत सिनेमात दिसत आहे.

महत्त्वाचं म्हणजे, किंग खान याने तब्बल चार वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यामुळे अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी सिनेमागृहात जमली. शिवाय सिनेमाच्या स्टार कास्टने ‘पठाण’चं कोणत्याही प्रकारचं प्रमोशन केलं नाही. पण शाहरुख सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चाहत्यांच्या संपर्कात होता. चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अभिनेत्याने विनोदी अंदाजात दिलं.

तर प्रदर्शनापूर्वीच ‘पठाण’ सिानेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण त्याचा कोणताही परिणाम सिनेमाच्या कमाईवर झाला नाही. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी घातली होती. ज्यामुळे अनेक ठिकाणी सिनेमाचा विरोध करण्यात आला. पण सिनेमाने मात्र चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.