बॉक्स ऑफिसचा ‘बादशहा’ Pathaan ; 6 दिवसांत इतक्या कोटी रुपयांची कमाई

गेल्या सहा दिवसांपासून शाहरुख खान स्टारर 'पठाण' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला; सहा दिवसांत सिनेमाने केली इतक्या कोटी रुपयांची कमाई... फक्त भारतातच नाही तर, परदेशातही पठाण सिनेमाची क्रेझ...

बॉक्स ऑफिसचा 'बादशहा' Pathaan ; 6 दिवसांत इतक्या कोटी रुपयांची कमाई
बॉक्स ऑफिसचा 'बादशहा' Pathaan ; 6 दिवसांत इतक्या कोटी रुपयांची कमाई
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 11:01 AM

Pathaan BO Collection Day 5 : अभनेता शाहरुख खान याने आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. शाहरुखच्या प्रत्येक सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. पण शाहरुख खान स्टारर पठाण सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. बुधवारी प्रदर्शित झालेल्या पठाण सिनेमाने अनेक हीट सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. बॉक्स ऑफिसवर पठाण सिनेमा रोज कोट्यवधी रुपयांचा गल्ला गोळा करताना दिसत आहे. मोठ्या पडद्याचा बादशाहा किंग खान याने चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आणि चाहत्यांना वेड लावलं. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या पठाण सिनेमाची चर्चा रंगत आहे.

प्रदर्शनानंतर पाच दिवसांत सिनेमाने जगभरात तब्बल ५५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सोमवारी देखील पठाण सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारु शकला नाही. सोमवारी सिनेमाने फक्त २५ कोटी रुपयांपर्यंत गल्ला गोळा केला. तर आतापर्यंत सिनेमाने भारतात जवळपास ३०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. अशी माहिती ट्रेड विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

हे सुद्धा वाचा

तर जगभरात सिनेमाने ६०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सध्या सर्वत्र पठाण सिनेमाचीच चर्चा आहे. आतापर्यंतच्या इतिहासात कमी कालावधीमध्ये जास्त कमाई करणार पठाण एकमेव सिनेमा ठरला आहे. सहा दिवसांमध्ये पठाण सिनेमाने अनेक विक्रम रचले आहे. पठाण सिनेमाची कामगिरी पाहून बॉलिवूडचे चांगले दिवस आले आहेत, अशी प्रतिक्रिया अनेक सेलिब्रिटींनी केली आहे.

सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनी साकारलेल्या भूमिकांची देखील चर्चा रंगत आहे. पठाण सिनेमात दीपिका जबरदस्त अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. शिवाय सलमान खानची एक अप्रतिम कॅमिओ भूमिका चाहत्यांच्या मनात घर करत आहे. म्हणून पुन्हा मोठ्या पडद्यावर शाहरुख आणि सलमान खान यांना पाहणं चाहत्यांसाठी खास आहे.

महत्त्वाचं शाहरुख खान याने मोठ्या पडद्यावर चार वर्षांनंतर पुन्हा पदार्पण केल्यामुळे अभिनेत्याला पाहण्यासाठी अनेक चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने ‘बेशर्म रंग’ गाण्यामध्ये घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण कोणत्याही वादाचा बॉक्स ऑफिसवर कोणताही परिणाम झाला नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.