AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनम कपूरची बहिण सोने व्यावसायिकाच्या प्रेमात वेडी; लवकरच करणार बॉलिवूड एन्ट्री

अभिनेत्री सोनम कपूरची बॉलिवूडमध्ये एक खास ओळखं आहे. आता तिची बहिण फिल्म इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमवण्यासाठी सज्ज आहे. तसेच ती तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे.

सोनम कपूरची बहिण सोने व्यावसायिकाच्या प्रेमात वेडी; लवकरच करणार बॉलिवूड एन्ट्री
shanaya kapoor Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 29, 2025 | 3:08 PM
Share

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांचे मुलं-मुली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तर काहीजण आता आगामी चित्रपटांद्वारे किंवा सीरिजद्वारे फिल्मी इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री घेत आहेत. या स्टारकिड्सपैकी एक आहे सोनम कपूर जीने बॉलिवूडमध्ये आपली एक खास ओळख बनवली आहे.एवढंच नाही तर तिला फॅशन आयकॉन मानलं जातं. मात्र बाळ झाल्यानंतर सोनम आता चित्रपटांमध्ये फार सक्रिय नाही आहे. पण ती इव्हेंट्समध्ये, शोमध्ये सहभागी होताना दिसते.

सोनमची ही बहिण बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार 

दरम्यान सोनम कपूरप्रमाणे तिच्या भावाने देखील बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अपेक्षित असं यश मिळालं नाही. आता सोनम कपूरची बहिण आता बॉलिवूडमध्ये आता आपलं नशीब आजमवण्यासाठी सज्ज आहे. सोनमची ही बहिण म्हणजे शनाया कपूर. जी संजय कपूरची मुलगी आहे. शनाया नात्याने सोनम कपूरची चुलत बहिण आहे.

सोन्याच्या व्यावसायिकाला करतेय डेट 

शनाया कपूर ‘तू या मैं’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चाहते शनायाच्या पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.मात्र संजय कपूरची मुलगी तिच्या बॉलिवूड पदार्पणापूर्वीच चर्चेत आली आहे.शनाया तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.शनाया एका सोन्याच्या व्यावसायिकाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. ज्याबद्दल ती हळूहळू सोशल मीडियावर चाहत्यांना माहिती देत ​​आहे. शनायाच्या चित्रपटांसोबतच चाहत्यांना तिच्या लव्ह लाईफबद्दलही जाणून घ्यायचे आहे. शनाया उद्योगपती करण कोठारीला डेट करत आहे. शनायाने नुकतीच तिच्या पदार्पणाच्या चित्रपटाची घोषणा केली. ज्या पोस्टवर करणने कमेंट केली.

दोघेही कॉलेज फ्रेंड्स 

करणने लिहिले आहे की, “तू वर्षानुवर्षे जे स्वप्न पाहत आहात ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे. ती आता तिचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. करणच्या या कमेंटनंतर दोघे एकत्र असल्याच्या बातम्यांना खात्री दिली गेली आहे. करण आणि शनाया यांनी एकत्र शिक्षण घेतले आहे. दोघेही एकाच कॉलेजमध्ये होते. करण त्याच्या वडिलांसोबत सोन्याचा व्यवसाय करतो.

शनायाच्या कामाबद्दल… 

शनायाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास शनायाने आतापर्यंत अनेक चित्रपट साइन केले आहेत. शनाया कपूरने करणच्या गोल्ड ब्रँडसाठी फोटोशूटही केले. ते फोटो तिचे खूप व्हायरलही होत आहेत. शनाया ‘आँखों के गुस्ताखिया’ मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात शनायासोबत विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शनाया कपूरने अलीकडेच चित्रपटाच्या सेटवरून विक्रांत मेस्सीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा.