‘प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे फोटो…’, बिकिनी फोटोंवर शर्मिला टागोर यांचं वक्तव्य
Sharmila Tagore : शर्मिला टागोर यांचे बिकिनीतील फोटो व्हायरल, तेव्हा माजली होती सर्वत्र खळबळ, सैफ अली खान याच्या शाळेत तर आईबद्दल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ अली खान आणि शर्मिला टागोर यांची चर्चा रंगली आहे.
मुंबई | 29 डिसेंबर 2023 : अभिनेता सैफ अली खान याची आई आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. एक काळ असा होता, जेव्हा इंडस्ट्रीमध्ये फक्त आणि फक्त शर्मिला टागोर यांच्या नावाची चर्चा असायची. पण त्याकाळी बिकिनीमध्ये फोटोशूट केल्यामुळे शर्मिला टागोर वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. ज्यामुळे शर्मिला टागोर यांना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला होता. त्या गोष्टीला आज अनेक वर्ष झाली आहेत. पण अनेक ठिकाणी शर्मिला टागोर आणि त्यांच्या बिकिनी फोटोशूटची चर्चा रंगलेली असते..
नुकताच शर्मिला टागोर मुलगा सैफ अली खान याच्यासोबत दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आल्या होत्या. शोमध्ये करण याने शर्मिला टागोर यांना बिकिनी फोटोशूटबद्दल विचारलं. यावर शर्मिला टागोर यांनी नाराजी व्यक्त करत, तेव्हा घडलेली परिस्थिती सांगितली.
शर्मिला टागोर म्हणाल्या, ‘फोटोग्राफर थोडा त्रासलेला होता. मला असं वाटलं होतं की मी सुंदर दिसेल. पण त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या तोंडावर मला वेगळेच भाव दिसत होतं. फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत… असं प्रत्येकाला वाटत होतं. या गोष्टीचं मला प्रचंड दुःख झालं होतं…’
‘फिल्मफेयरमध्ये जेव्हा फोटो आले तेव्हा मी लंडनमध्ये होती. तेव्हा दिग्दर्शक शक्ती सामंत यांचा मला फोन आला. ते मला म्हणाले, तू पुन्हा भारतात येऊ शकतेस. या ठिकाणी अनेक वाईट गोष्टी घडत आहेत. जर तुला चाहत्यांमध्ये चर्चेत राहायचं असेल तर, हा योग्य पर्याय नाही… असं देखील ते मला म्हणाले होते..’
पुढे शर्मिला टागोर म्हणाल्या, ‘तेव्हा मी एकटी राहात होती. येत असलेल्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे मला प्रचंड वाईट वाटत होतं. पण टायगर (शर्मिला टागोर यांचे पती मंसूर अली खान) यांनी मला टेलीग्राम पाठवलं आणि म्हणाले फोटोंमध्ये तू फार सुंदर दिसत आहेस… फक्त त्यांच्याकडून मला पाठिंबा मिळाला होता…’
शर्मिला टागोर यांनी घडलेली परिस्थिती सांगितल्यानंतर, सैफ अली खान म्हणाला, ‘मला माझ्या आईवर गर्व वाटत आहे. तिने सर्व संकटांवर मात केली. मला बोर्डिंग स्कूलमध्ये लोकं विचारायची, ती तुझी आई आहे का? तेव्हा मला गर्व वाटयचा…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ अली खान आणि शर्मिला टागोर यांची चर्चा रंगली आहे.