‘त्या’ एका व्यक्तीमुळे शर्मिला टागोर यांनी मध्यरात्री हटवले रस्त्यावरील बिकिनीचे पोस्टर; संसदेपर्यंत पोहोचला होता मुद्दा

चित्रपटात केवळ ग्लॅमर असणंच पुरेसं नसतं, असंही त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं. 'आराधना'नंतर 'अमर प्रेम', 'आविष्कार', 'मौसम' आणि 'नमकीन' यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या.

'त्या' एका व्यक्तीमुळे शर्मिला टागोर यांनी मध्यरात्री हटवले रस्त्यावरील बिकिनीचे पोस्टर; संसदेपर्यंत पोहोचला होता मुद्दा
Sharmila TagoreImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 3:12 PM

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीत 70 च्या दशकात अभिनेत्रीने बिकिनी घालणं ही सर्वसामान्य गोष्ट नव्हती. त्यावेळी 1967 मध्ये अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी ‘ॲन इव्हनिंग इन पॅरिस’ या चित्रपटात बिकिनी घालून अक्षरश: धुमाकूळ घातला होता. एका बिकिनीमुळे तेव्हाच्या काळात काय वाद झाला, त्याविषयी त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. शर्मिला टागोर या एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांनी बिकिनीचा किस्सा सांगितला. फिल्म इंडस्ट्रीपासून ते संसदेपर्यंत बिकिनीवरून प्रश्न उपस्थित केला गेला, असं त्या म्हणाल्या.

शर्मिला टागोर म्हणाल्या, “जेव्हा मी ॲन इव्हनिंग इन पॅरिसमध्ये काम केलं होतं. तेव्हा त्यातील माझ्या बिकिनी सीनवरून खूप मोठा वाद झाला होता. सर्वसामान्यांसोबतच इंडस्ट्रीतील लोकंसुद्धा आश्चर्यचकीत झाली होती. त्यावेळी कदाचित संसदेतही त्यावरून प्रश्न विचारला गेला. मात्र हल्लीच्या काळातील चित्रपटांमध्ये जे दृश्य असतात, त्या तुलनेत ते खूपच साधं होतं.”

यावेळी त्यांनी असंही सांगितलं की एका मध्यरात्री त्यांना घराजवळील पोस्टर हटवावे लागले होते. शर्मिला यांच्या सासू त्यावेळी शहरात येणार होत्या. म्हणून ड्रायव्हरला सांगून त्यांनी घराजवळील सर्व बिकिनीचे पोस्टर्स हटवण्यास लावले होते. मात्र एअरपोर्टच्या मार्गावर इतरही पोस्टर असतील, हे त्यांच्या लक्षात आलं नव्हतं.

हे सुद्धा वाचा

चित्रपटात केवळ ग्लॅमर असणंच पुरेसं नसतं, असंही त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं. ‘आराधना’नंतर ‘अमर प्रेम’, ‘आविष्कार’, ‘मौसम’ आणि ‘नमकीन’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. नुकतंच त्यांनी ‘गुलमोहर’ या चित्रपटातून पुनरागमन केलं आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर 3 मार्च रोजी प्रदर्शित झाला.

आजच्या काळातही बिकिनीवरून वाद

70 च्या दशकात अभिनेत्री बिकिनी घालणं सर्वसामान्य नसलं तरी हल्लीच्या काळातही बिकिनीवरून वाद झाले आहेत. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटात जेव्हा अभिनेत्री दीपिका पदुकोण भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसली, तेव्हा देशभरात त्यावरून खूप मोठा वाद झाला होता. दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घालून सनातन धर्माचा अपमान केला, असा आरोप काही हिंदू संघटनांनी लावला. त्यावरून चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचीही मागणी करण्यात आली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.