ब्रेकअपपूर्वी अभिनेत्रीची अट; शत्रुघ्न सिन्हा यांना दिला आठ दिवसांचा कालावधी, अत्यंत लव्हस्टोरीचा वाईट अंत

सात वर्ष डेट केल्यानंतर अत्यंत वाईट झाला शत्रुघ्न सिन्हा यांच्या लव्हस्टोरीचा अंत... ब्रेकअपूर्वी अभिनेत्रीची अट ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

ब्रेकअपपूर्वी अभिनेत्रीची अट; शत्रुघ्न सिन्हा यांना दिला आठ दिवसांचा कालावधी, अत्यंत लव्हस्टोरीचा वाईट अंत
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 3:10 PM

Shatrughan Sinha And Reena Roy Breakup Story : अनेक वर्ष बॉलिवूडवर राज्य केलेले सेलिब्रिटी आज त्यांच्या आयुष्यात त्यांच्या कुटुंबासोबत आनंदी आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा काही सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले. दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) आणि रीना रॉय (Reena Roy) यांच्या लव्हस्टोरीबद्दल देखील अनेक चर्चा रंगल्या. आज अनेक वर्षांनंतर देखील त्यांच्या प्रेम कहाणीचे काही किस्से चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांनी १९७६ प्रदर्शित झालेल्या ‘कालीचरण’ सिनेमातून पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र वाऱ्यासारखी पसरु लागली.

‘कालीचरण’ सिनेमाचे दिग्दर्शक सुभाष घाई यांनी शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्या नात्याबद्दल एका मुलाखतीत मोठा खुलासा केला होता. सुभाष घाई मुलाखतीत म्हणाले, ‘रीना रॉय यांच्यासोबत ‘कालीचरण’ सिनेमात काम करण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा नकार देत होते. त्यानंतर अखेर रीना यांच्यासोबत काम करण्यास शत्रुघ्न सिन्हा यांनी होकार दिला.

‘कालीचरण’ सिनेमात काम करत असताना दोघे एकमेकांच्या फार जवळ आले. सिनेमानंतर त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांनी एकमेकांना जवळपास सात वर्ष डेट केलं. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर शत्रुघ्न सिन्हा यांनी अभिनेत्री पूनम सिन्हा यांच्यासोबत लग्न केलं. शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्या लव्हस्टोरीचा अंत फार वाईट झाला.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा रीना रॉय यांना शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम यांच्या नात्याबद्दल कळालं तेव्हा अभिनेत्रीला मोठा धक्का बसला. शत्रुघ्न सिन्हा, पूनम यांना अधिक महत्त्व देत असल्याचं रीना रॉय यांना कळालं, तेव्हा रीना यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना पूनम यांच्यासोबत काम करण्यास बंदी घातली. पण शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम यांचं नातं फार घट्ट झालं होतं.

दरम्यान, ‘हथकडी’ सिनेमाचे निर्माते पहलाज निहलानी शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम यांच्या नात्याबद्दल सर्वकाही माहिती होतं. कारण शत्रुघ्न सिन्हा आणि पहलाज निहलानी चांगले मित्र होते. जेव्हा पहलाज निहलानी, रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत ‘आंधी तूफान’ सिनेमा तयार करण्याच्या विचारात होते, तेव्हा रीना रॉय म्हणाल्या, ‘पहिल्यांदा शत्रुघ्न सिन्हा यांना सांगा माझ्यासोबत लग्न करणार नसतील येत्या आठ दिवसांमध्ये दुसऱ्या मुलीसोबत विवाह करायला..’

शत्रुघ्न सिन्हा यांचं उत्तर आल्यानंतरच ‘आंधी तूफान’ सिनेमासाठी तयार होईल असं देखील रीना रॉय सिनेमाचे निर्माते पहलाज निहलानी यांना म्हणाल्या. पण असं काही झालं नाही. शत्रुघ्न सिन्हा यांनी रीना रॉय यांच्यासोबत लग्न न करता पूनम सिन्हा यांच्यासोबत लग्न केलं. याकारणामुळे निर्माते पहलाज निहलानी यांच्या ‘आंधी तूफान’ सिनेमात रीना रॉय यांनी काम केलं नाही.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.