सिन्हा कुटुंबातून सोनाक्षीला बाहेरचा रस्ता? झहीर इक्बालसोबतच्या लग्नानंतर वडिलांनी…
सोनाक्षी सिन्हा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हाने काही वर्षे डेट केल्यानंतर झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगताना दिसली. जवळपास हे लग्न महिन्याभरापासून सुरू होते. हेच नाहीतर प्री वेडिंग फंक्शन अनेक ठिकाणी ठेवण्यात आले. देशच नाहीतर विदेशातूनही लोक या लग्नामध्ये सहभागी झाले. विशेष:बॉलिवूड स्टार या लग्नात धमाका करताना दिसले. जवळपास सर्वच कलाकार हे लग्नात सहभागी होताना दिसले. आता या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या लग्नामध्ये शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा, लव सिन्हा आणि कुश सिन्हा हे पोहोचले होते. दुसरीकडे सोनाक्षी सिन्हा ही देखील पती झहीर इक्बाल याच्यासोबत पोहोचली होती.
अनंत अंबानीच्या लग्नाला शत्रुघ्न सिन्हा हे पोहोचले नव्हते. आता नुकताच शत्रुघ्न सिन्हा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले की, सोनाक्षी आणि झहीरच्या ‘वेडिंग ऑफ द सेंच्युरी’ नंतर आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न सर्वाधिक चर्चेत राहिले आहे. हे लग्न महिनाभर सुरू होते.
खरोखरच या लग्नाने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत आणि नवीन रेकॉर्ड तयार केले आहेत. या लग्नात देश आणि विदेशातून लोक सहभागी झाले. कलाकार, क्रीडा, राजकिय आणि सामाजिक क्षेत्रातूनही लोक या लग्नसोहळ्यास पोहोचले होते. पुढे शत्रुघ्न सिन्हा यांनी लिहिले की, या सर्व आयोजनाचे श्रेय हे मी नीता अंबानी, त्यांचे पती आणि माझे मित्र मुकेश अंबानी आणि त्यांच्या संपूर्ण टिमला देतो.
It has been a month of ‘events’ with #Sonakshi & Zaheer ‘Wedding of the Century’ followed up with ‘The Most Talked About Wedding of The Millennium’ #AnantAmbani & #RadhikaMerchant it was the record making & record breaking marriage in totality & true sense as the who’s who of… pic.twitter.com/DMejwIVRzY
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) July 15, 2024
मी काही कामात व्यस्त असल्याने या लग्नाला उपस्थित राहू शकलो नाही. माझी पत्नी पूनम सिन्हा, माझा मुलगा लव सिन्हा, कुश सिन्हा आणि त्यांची सुंदर पत्नी तरुणा सिन्हा यांनी हजेरी लावली. नेहमीप्रमाणेच अंबानी कुटुंबाच्या आदरातिथ्याचा आनंद घेतला. मात्र, यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी सिन्हा हिचे नाव त्यांच्या कुटुंबियांच्या यादीत घेणे टाळले.
सोनाक्षी सिन्हा ही देखील अंबानींच्या लग्नात उपस्थित होती. मात्र, शत्रुघ्न सिन्हा यांनी सर्वांची नावे घेतली. मात्र, मुलगी सोनाक्षी सिन्हा आणि जावई झहीर इक्बाल असे म्हटले नाही. आता शत्रुघ्न सिन्हा यांच्या या पोस्टची तूफान चर्चा रंगताना दिसत आहे. शत्रुघ्न सिन्हा हे मुलगी सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नात तिच्यासोबत दिसले. मात्र, सोनाक्षी सिन्हाच्या दोन्ही भावांनी या लग्नाकडे पाठ फिरवल्याचे बघायला मिलाले.