Tunisha Sharma: तुनिशाच्या आत्महत्येविषयी कळताच शिझानच्या सिक्रेट गर्लफ्रेंडने उचललं हे पाऊल; पोलिसांसमोर दिली कबुली

तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणी शिझानच्या सिक्रेट गर्लफ्रेंडची चौकशी; पोलिसांसमोर कबुल केली 'ही' मोठी गोष्ट

Tunisha Sharma: तुनिशाच्या आत्महत्येविषयी कळताच शिझानच्या सिक्रेट गर्लफ्रेंडने उचललं हे पाऊल; पोलिसांसमोर दिली कबुली
Tunisha sharma, Sheezan Khan
Follow us
| Updated on: Jan 08, 2023 | 11:27 AM

मुंबई: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येनंतर तिचा सहअभिनेता आणि एक्स-बॉयफ्रेंड शिझान खानवर बरेच प्रश्न उपस्थित झाले. तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणी शिझान सध्या पोलीस कोठडीत आहे. कोर्टाने त्याच्या जामिनाचा अर्ज फेटाळला. 31 डिसेंबर रोजी त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मुंबई पोलिसांकडून शिझानची चौकशी सुरू असून याप्रकरणी त्याच्या सिक्रेट गर्लफ्रेंडविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. शिझानच्या सिक्रेट गर्लफ्रेंडने तिच्या मोबाइलमधील त्याच्यासोबतचे चॅट्स डिलिट केले होते. हे चॅट्स आता पोलिसांच्या हाती लागले आहेत. तुनिशा आत्महत्या प्रकरणात शिझानच्या सिक्रेट गर्लफ्रेंडचा हात आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

कोण आहे शिझानची सिक्रेट गर्लफ्रेंड?

मुंबई पोलिसांनी शिझानच्या सिक्रेट गर्लफ्रेंडची चौकशी केली आहे. शिझानसोबतच्या तिच्या नात्याविषयी पोलिसांनी तिला प्रश्न विचारले. मात्र या सिक्रेट गर्लफ्रेंडचं नाव अद्याप समोर आलं नाही. तुनिशाच्या आत्महत्येची बातमी समोर येताच शिझानसोबतचे चॅट्स डिलिट केल्याची कबुली तिने पोलिसांसमोर दिली. डिलिट केलेले हे चॅट्स वसई पोलिसांनी रिकव्हर केले आहेत.

तुनिशाशी ब्रेकअप केल्यानंतर शिझान बऱ्याच मुलींशी बोलत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. इतकंच नव्हे तर ज्या दिवशी तुनिशाने आत्महत्या केली, त्यादिवशी तो सिक्रेट गर्लफ्रेंडशी जवळपास तासभर चॅट करत होता, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा

“तपासादरम्यान शिझानच्या मोबाइलमध्ये महत्त्वाचे चॅट्स सापडले आहेत. ब्रेकअपनंतर तो तुनिशाशी बोलणं टाळत होता. तुनिशा त्याला सतत मेसेज करत होती पण तो तिला रिप्लाय देत नव्हता”, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान शिझानची कोणतीच सिक्रेट गर्लफ्रेंड नव्हती, असा दावा त्याच्या बहिणींनी केला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.