Shehnaaz Gill रुग्णालयात दाखल, अभिनेत्रीच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

Shehnaaz Gill | शहनाज गिल रुग्णालयात दाखल; लाईव्ह येत शहनाज हिने प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे. अभिनेत्रीला रुग्णालयात पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील व्यक्त केली चिंता... चाहते देखील शहनाज हिच्यासाठी प्रार्थना देखील करत आहेत... अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Shehnaaz Gill रुग्णालयात दाखल, अभिनेत्रीच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 9:26 AM

मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : लोकप्रिय अभिनेत्री शहनाज गिल हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर लाईव्ह येत अभिनेत्रीने रुग्णालयात दाखल असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. शहनाज रुग्णालयात आहे म्हणून चाहते देखील चिंता व्यक्त करत आहे. शिवाय शहनाज हिची प्रकृती लवकरात-लवकर स्थिर व्हवी म्हणून प्रार्थना देखील करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे शहनाज हिने सोशल मीडियावर लाईव्ह येत चाहत्यांना प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शहनाज गिल हिची चर्चा रंगली आहे. पोटाचा संसर्ग झाल्यामुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवाय ‘मी आता ठिक आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

पोटाचा संसर्ग झाल्यामुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे शहनाज हिच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रिया कपूर देखील रुग्णालयात पोहोचली होती. चाहते देखील अभिनेत्रसाठी प्रर्थना करत आहेत. रुग्णालयातून लाईव्ह येत अभिनेत्री म्हणाली, ‘वेळ प्रत्येकाची येत…’

हे सुद्धा वाचा

व्हिडीओमध्ये शहनाज म्हणते, ‘वेळ प्रत्येकाची येत माझी देखील आली आहे. पुन्हा काही दिवसांनी माझी वेळ येईल. आता माझी प्रकृती स्थिर आहे. मला इंफेक्शन झालं होतं. मी सँडविच खाल्ल होतं म्हणून मला इंफेक्शन झालं…’ सोशल मीडियावर अभिनेत्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

शहनाज हिचे सिनेमे

शहनाज नुकताच, ‘थँक यू फॉर कमिंग’ (Thank You For Coming) सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात अभिनेत्री भूमी पेडणेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला आहे. शहनाज हिने अभिनेता सलमान खान याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. आता चाहते अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

शहनाज कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयु्ष्यामुळे चर्चेत असते. ‘बिग बॉस’मुळे शहनाज हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. शोमध्येच शहनाज गिल आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांच्यामध्ये प्रेम बहरलं. चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. पण अभिनेत्याच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडली होती.

पण आता शहनाज हिच्या नावाची चर्चा प्रसिद्ध पंजाबी गायक गुरु रंधावा याच्यासोबत होत आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्यावर मौन बाळगलं आहे. सध्या सर्वत्र शहनाज गिल हिची चर्चा रंगली आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.