‘दिल तुडवाने में मजा आता है..’, डोळ्यात पाणी असताना असं का म्हणाली Shehnaaz Gill?
'तुला रडताना पाहू शकत नाही...', सर्वांसमोर शहनाज गिल हिच्या डोळ्यात आलं पाणी... अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही देखील व्हाल भावुक... सर्वत्र शहनाजच्या व्हिडीओची चर्चा...
मुंबई | 16 जुलै 2023 : अभिनेत्री शहनाज गिल कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. खासगी आयुष्यात अनेक चढ – उतार पाहिलेल्या शहनाज गिल हिने अभिनेता सलमान खान याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान देखील अभिनेत्री अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली. पण आता देखील शहनाज हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खुद्द शहनाज हिने व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामुळे शहनाज तुफान चर्चेत आली आहे. शहनाज हिने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव तर करत आहेत, पण शहनाज हिचा व्हिडीओ पाहून अभिनेत्रीचे अनेक चाहते भावुक देखील झाले आहेत.
नुकताच शहनाज हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री स्टेजवर गाणं म्हणताना दिसत आहे. अभिनेत्रीने पंजाबी गाणं ‘दिल तोड़े ने’गायलं आणि जमलेला प्रत्येक जण उत्साही झाली. याच दरम्यान शहनाज असं काही म्हणाली ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
View this post on Instagram
पंजाबी गाणं ‘दिल तोड़े ने’ म्हणत असताना शहनाज म्हणाली, ‘दिल तुडवाने में मजा आता है..’ ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. एवढंच नाही तर अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी देखील आहे… अभिनेत्रीला सर्वांसमोर रडताना पाहून शहनाज हिच्या चाहत्यांना दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याची आठवण आली.
शहनाज हिने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर चाहते कमेंट करत भावना व्यक्त करत आहेत. एक नेटकरी शहनाज हिच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘तुला रडताना आम्ही पाहू शकत नाही…’, तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तुझा आवाज प्रचंड गोड आहे…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शहनाज हिच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.
सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाज गिल पूर्णपणे कोलमडली होती. अनेक दिवस अभिनेत्री सोशल मीडिया आणि माध्यमांपासून देखील दूर होती. पण शहनाज हिने मोठ्या धैर्याने स्वतःला सांभाळलं. मात्र, ‘किसी का भाई किसी की जान’च्या शूटिंगदरम्यान शहनाज गिलचे नाव कोरिओग्राफर राघव जुयालसोबत जोडण्यात आलं. पण यावर दोघांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.