Video: सिंहाला रुममध्ये पाहून शहनाझ गिलची उडाली घाबरगुंडी; व्हिडीओ व्हायरल

दिया मिर्झाची शहनाझला व्हिडीओ डिलिट करण्याची विनंती; असं नेमकं काय घडलं?

Video: सिंहाला रुममध्ये पाहून शहनाझ गिलची उडाली घाबरगुंडी; व्हिडीओ व्हायरल
Shehnaaz GillImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 7:49 AM

दुबई: बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाझ गिल एका कार्यक्रमानिमित्त सध्या दुबईत आहे. तिथले फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यांनासोबत शेअर करतेय. दुबईत पार पडलेल्या ‘मिडल ईस्ट अचिवर्स नाईट 2022’ या कार्यक्रमाला तिने हजेरी लावली होती. जान्हवी कपूर, सनी लिओनी, रणवीर सिंग, गोविंदा, हेमा मालिनी यांसारखे सेलिब्रिटीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये शहनाझ एका सिंहाच्या पिल्लाला रुममध्ये पाहून घाबरताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

शहनाझने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सिंहाचा छावा आणि त्याच्या आजबाजूला बरीच लोकं दिसत आहेत. एका रूममध्ये तो आरामात इकडे तिकडे फिरताना दिसतोय आणि त्याला असं मोकळं फिरताना पाहून शहनाझ प्रचंड घाबरली आहे.

हे सुद्धा वाचा

एक व्यक्ती शहनाझला रूममध्ये बोलवतो. धाडस करून ती आत जायला तयार होते. मात्र जेव्हा ते सिंहाचं पिल्लू तिच्या जवळ येऊ लागतं, तेव्हा ती “वाहेगुरू, वाहेगुरु” असं ओरडत रूमच्या बाहेर पळून जाते.

शहनाझच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. ‘ ती रूममध्ये गेली हीच मोठी गोष्ट आहे ,’ असं एकाने म्हटलं आहे. तर ‘ तू स्वतःच सिंहीण आहेस ,’ अशी कमेंट दुसऱ्या युजरने केली. विशेष म्हणजे अभिनेत्री दिया मिर्झाने शहनाझला हा व्हिडीओ डिलिट करण्याची विनंती केली आहे. ‘वन्य प्राण्यांनी जंगलातच राहावं, लोकांच्या घरात नाही’, असं तिने म्हणत तिने व्हिडीओ डिलिट करण्याची विनंती केली.

शहनाझला पंजाबची कतरिना कैफ असंही म्हटलं जातं. तिने बरीच पंजाबी गाणी गायली आहेत. तर काही म्युझिक व्हिडिओमध्येही ती झळकली आहे. बिग बॉसमध्ये हजेरी लावल्यानंतर तिची लोकप्रियता अधिक वाढली. बिग बॉसमध्ये अभिनेता सिद्धार्थ शुक्लाशी शहनाझची खूप चांगली मैत्री झाली. सिद्धार्थच्या निधनानंतर ती खूप खचली होती. शहनाझ लवकरच सलमान खानच्या किसी का भाई किसी को जान या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.