AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शहनाज गिलच्या ‘ढोंगीपणा’चा पर्दाफाश; बिग बॉस 13 मधील व्हिडीओ व्हायरल, असिम रियाजच्या चाहत्यांनी घेरलं

सिद्धार्थ, शहनाज आणि असिमचे चाहते आपापसांत भिडले आहेत. यादरम्यान शहनाजचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनंतर शहनाजवर 'फेक फेमिनिस्म'चा (बनावट स्त्रीवाद) आरोप केला जातोय.

शहनाज गिलच्या 'ढोंगीपणा'चा पर्दाफाश; बिग बॉस 13 मधील व्हिडीओ व्हायरल, असिम रियाजच्या चाहत्यांनी घेरलं
Asim Riaz and Shehnaaz GillImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 27, 2023 | 12:08 PM
Share

मुंबई : बिग बॉसच्या आताच्या सोळाव्या सिझनप्रमाणेच सिझन 13 सुद्धा खूप गाजला होता. या सिझनमधील जवळपास सर्व स्पर्धक प्रकाशझोतात आले होते. यापैकी सिद्धार्थ शुक्ला, शहनाज गिल आणि असिम रियाज यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. सिद्धार्थ या शोचा विजेता ठरला होता, असिम फर्स्ट रनर अप आणि शहनाज तिसऱ्या क्रमांकावर होती. सिद्धार्थ आता या जगात नाही. त्याच्या निधनानंतर जवळपास तीन वर्षांनी असिम रियाजने धक्कादायक खुलासे केले. असिमने बिग बॉसच्या निर्मात्यांवरही गंभीर आरोप केले. असिमच्या याच आरोपांमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय. सिद्धार्थ, शहनाज आणि असिमचे चाहते आपापसांत भिडले आहेत. यादरम्यान शहनाजचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनंतर शहनाजवर ‘फेक फेमिनिस्म’चा (बनावट स्त्रीवाद) आरोप केला जातोय.

हा व्हिडीओ शेअर करत युजरने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘फेक फेमिनिस्मचं उदाहरण आहे शहनाज गिल. एक महिलाच दुसऱ्या महिलेची शत्रू असते, हे खरंय. ही फेकनाज महिलांच्या सशक्तीकरणावर ज्ञान देणार का? असिमने तिच्या ढोंगीपणाचा पर्दाफाश केला.’

व्हिडीओत नेमकं काय?

या व्हिडीओमध्ये तीन फुटेज एकत्र दाखवण्यात आले आहेत. त्यापैकी एक बिग बॉस 13 मधील, दुसरा ब्रह्मकुमारीच्या एका कार्यक्रमातील आणि तिसरा शहनाजच्या शोचा आहे. ब्रह्मकुमारीच्या कार्यक्रमात शहनाज म्हणतेय की तिच्या आत्या, मावशी या सशक्त महिला होत्या. त्यांनीच तिला शक्तीशाली बनवलं. यानंतर शहनाजचा बिग बॉस 13 मधील क्लिप दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओत ती म्हणतेय, “मर्द बन, लडकी नही. इतरांच्या बोलण्यात अडकण्याचं काम मुलींचं असतं.” यानंतर ब्रह्मकुमारीच्या क्लिपमध्ये शहनाज म्हणते, “मी स्वत: एक मुलगी आहे. मुलींचं खच्चीकरण करू नका. मुलीने मुलांसारखं असलं पाहिजे असं म्हणतात. पण आम्हाला मुलगा बोलून आमचं अपमान का करताय? आम्ही मुली आहोत, तुम्ही आम्हाला हा कमजोर बनवत आहात.”

पहा व्हिडीओ

तिसऱ्या क्लिपमध्ये शहनाज तिच्या शोमध्ये अभिनेत्री रकुल प्रीत सिंगसोबत पहायला मिळतेय. यामध्ये ती सांगते की मुलांसोबत ती जास्त कम्फर्टेबल असते. “शाळा आणि कॉलेजमध्ये माझी सर्वाधिक मैत्री मुलांशीच व्हायची. मी मुलींसोबत फार राहिले नाही. मुलांची मुलींसोबत चांगली मैत्री होते”, असं ती म्हणताना दिसतेय.

शहनाज गिलची दुटप्पी भूमिका

शहनाज तिच्या या तीन वेगवेगळ्या व्हिडीओमध्ये वेगवेगळं बोलताना दिसतेय. एकीकडे ती महिलांच्या सशक्तीकरणाबद्दल बोलतेय. तर दुसरीकडे तीच मुलींना म्हणतेय की ‘मर्द बन, लडकी नहीं’. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी शहनाजवर दुटप्पीपणाची टीका करत आहेत.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.