सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज कोणाला करतेय डेट? लग्नाविषयीही केला खुलासा

2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थ हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्याच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे खचली होती. आता पहिल्यांदाच शहनाज तिच्या डेटिंग लाइफ, बॉयफ्रेंड आणि लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज कोणाला करतेय डेट? लग्नाविषयीही केला खुलासा
शहनाज गिल, सिद्धार्थ शुक्लाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 11:36 AM

मुंबई : अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिलला ‘बिग बॉस’ या शोमुळे खूप प्रसिद्धी मिळाली. बिग बॉसच्या तेराव्या सिझनमध्ये तिने भाग घेतला होता. शहनाज हा सिझन जिंकली तर नव्हती मात्र, तिच्या स्वभावाने आणि सिद्धार्थ शुक्लासोबतच्या मैत्रीने चाहत्यांची मनं जिंकली होती. बिग बॉसच्या घरात या दोघांची खास केमिस्ट्री पहायला मिळाली होती. चाहत्यांना या दोघांना ‘सिडनाज’ असं टोपणनावही दिलं होतं. सिद्धार्थ आणि शहनाजने त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली नव्हती. मात्र हे दोघं एकमेकांना डेट करत होते, अशी जोरदार चर्चा होती. 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थ हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्याच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे खचली होती. आता पहिल्यांदाच शहनाज तिच्या डेटिंग लाइफ, बॉयफ्रेंड आणि लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

शहनाज गिल कोणाला करतेय डेट?

शहनाजने काही दिवसांपूर्वीच ‘देसी वाइब्स विद शहनाज गिल’ हा तिचा नवीन शो सुरू केला. या शोमध्ये विविध सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटांचं प्रमोशन करण्यासाठी येतात. नुकतीच अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने या शोमध्ये हजेरी लावली होती. तिच्यासमोर शहनाजने खुलासा केला की ती सध्या सिंगल आहे आणि कोणालाच डेट करत नाहीये. शहनाजचं नाव बऱ्याच कलाकारांसोबत जोडलं गेलं, मात्र ती सध्या कोणालाच डेट करत नसल्याचं अभिनेत्रीने स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

लग्नाबद्दल काय आहेत विचार?

डेटिंग लाइफ आणि बॉयफ्रेंडविषयी खुलासा केल्यानंतर शहनाज तिच्या लग्नाच्या प्लॅन्सविषयीही मोकळेपणे व्यक्त झाली. तिच्या शोच्या एका एपिसोडमध्ये युट्यूबर भुवन बामने हजेरी लावली होती. त्याच्याशी बोलताना शहनाजने सांगितलं की सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर तिचा लग्नावरून विश्वासच उडाला आहे. “भविष्यात काय घडेल हे सांगता येत नाही. अशा वेळी आपण प्रत्येक गोष्टीसाठी तयार असायला हवं. सध्या मी माझ्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रीत करतेय. जेव्हा माझ्याकडे काहीच काम नसेल तेव्हा मला इतरांसमोर हात पसरवण्याची वेळ येऊ नये”, असं ती म्हणाली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.