Shehnaaz Gill | “आओ और जाओ, दफा हो जाओ”; प्रेमात झालेल्या फसवणुकीनंतर शहनाजने व्यक्त केलं दु:ख

बिग बॉसच्या घरात शहनाज आणि सिद्धार्थ शुक्लाची जवळीक प्रेक्षकांना पहायला मिळाली. घरातून बाहेर पडल्यानंतर हे दोघं अनेकदा एकत्र दिसले होते. मात्र माध्यमांसमोर रिलेशनशिपची कबुली दोघांनी कधीच दिली नव्हती.

Shehnaaz Gill | आओ और जाओ, दफा हो जाओ; प्रेमात झालेल्या फसवणुकीनंतर शहनाजने व्यक्त केलं दु:ख
Shehnaaz Gill Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 2:30 PM

मुंबई : पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शहनाज गिल ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. बिग बॉसच्या घरात तिचं नाव अभिनेता सिद्धार्थ शुक्लाशी जोडलं गेलं होतं. चाहत्यांनी या दोघांच्या जोडीला ‘सिदनाज’ असं नाव दिलं होतं. मात्र सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे खचली होती. काही महिने ती माध्यमांपासून आणि सोशल मीडियापासून दूर होती. सिद्धार्थच्या निधनाच्या दु:खातून सावरल्यानंतर शहनाजने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शहनाज प्रेम आणि रिलेशनशिप यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. प्रेमात फसवणूक झाल्याचा खुलासादेखील तिने केला.

‘इन्स्टंट बॉलिवूड’ला दिलेल्या मुलाखतीत शहनाजला विचारण्यात आलं की तिचा कधी प्रेमभंग झाला का? त्यावर ती म्हणाली, “मी आजपर्यंत प्रेमात कोणाची फसवणूक केली नाही. पण स्पष्ट बोलायचं झाल्यास, सर्वांनी माझी फसवणूक केली. समोरच्याच व्यक्तीने मला सोडलं. ज्यावेळी तुमच्या पार्टनरची नजर दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीवर असते, तेव्हा आपण एक पाऊल मागेच येतो. धोका दिल्यावर निघून जा.. आता मी हाच विचार करते की जर तुम्हाला यायचं असेल तर या, जायचं असेल तर जा. खड्ड्यात जा.”

हे सुद्धा वाचा

बिग बॉसच्या घरात शहनाज आणि सिद्धार्थ शुक्लाची जवळीक प्रेक्षकांना पहायला मिळाली. घरातून बाहेर पडल्यानंतर हे दोघं अनेकदा एकत्र दिसले होते. मात्र माध्यमांसमोर रिलेशनशिपची कबुली दोघांनी कधीच दिली नव्हती. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सलमानने सर्वांसमोर शहनाजला तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला दिला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डान्सर आणि कोरिओग्राफर राघव जुयालसोबत शहनाजचं नाव जोडलं गेलं होतं.

अफेअरच्या चर्चांवर खुद्द राघवने उत्तर दिलं होतं. ‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत राघव म्हणाला होता, “इंटरनेटवरील गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. जोपर्यंत मी स्वत: ते पाहत नाही किंवा ऐकत नाही, तोपर्यंत ते खरं आहे की खोटं ते मला माहीत नाही. मी इथे चित्रपटासाठी आलो आहे आणि मला लोकांनी एक अभिनेता, डान्सर आणि सूत्रसंचालक म्हणून ओळखावं अशीच माझी इच्छा आहे. मी कामातून व्यक्त होतो. बाकी या सर्व गोष्टी (डेटिंगच्या चर्चा) असो किंवा नसो.. आणि हे सर्व शक्यच नाही. कारण माझ्याकडे तेवढा वेळच नाही. मी डबल शिफ्टमध्ये काम करतो. सध्या माझी परिस्थिती अशी आहे की या सर्व गोष्टींसाठी माझ्याकडे वेळच नाही.”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.