फेक इन्स्टाग्राम अकाऊंट चालवताना पकडली गेली Shehnaaz Gill; सलमानसोबतचा फोटो करत होती पोस्ट

बॉलिवूड डेब्युसोबतच शहनाज तिच्या खासगी आयुष्यामुळेही खूप चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून राघव जुयाल आणि शहनाज यांच्या डेटिंगच्या जोरदार चर्चा आहेत. इतकंच नव्हे तर हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत, असंही म्हटलं जात होतं.

फेक इन्स्टाग्राम अकाऊंट चालवताना पकडली गेली Shehnaaz Gill; सलमानसोबतचा फोटो करत होती पोस्ट
Shehnaaz GillImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 12:11 PM

मुंबई : ‘बिग बॉस 13’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शहनाज गिल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. ती लवकरच सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ती या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसतेय. नुकताच शहनाजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधून तिच्या फेक इन्स्टाग्राम अकाऊंटची पोलखोल झाली आहे. शहनाज स्वत: तिचं फेक अकाऊंट चालवताना दिसली.

शहनाजच्या फेक अकाऊंटची पोलखोल

अनेक बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींचे सोशल मीडियावर फेक अकाऊंट असतात. बऱ्याचदा खुद्द सेलिब्रिटीच हे फेक अकाऊंट चालवत असतात. काहींनी याची कबुलीसुद्धा दिली आहे. नुकतीच शहनाज गिल तिचं फेक इन्स्टाग्राम अकाऊंट चालवताना दिसली. मंगळवारी रात्री ती सलमान खानची भेट घेऊन गाडीने घरी जात होती. त्यावेळी पापाराझींनी तिचा व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओमध्ये तिला मोबाइल स्पष्ट पहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

सलमानसोबत काढलेला सेल्फी ती इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत होती. यावेळी ती फेक अकाऊंट चालवताना दिसली. या व्हिडीओत नेटकऱ्यांची नजर तिच्या फेक अकाऊंटवर गेली. शहनाजच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर जवळपास 14 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मात्र तिच्या फेक अकाऊंटला दहापेक्षाही कमी लोक तिला फॉलो करतात. मात्र ती बऱ्याच लोकांना फॉलो करते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काहींनी पापाराझींवरही टीका केली. सेलिब्रिटींच्या प्रायव्हसीचा आदर न केल्याबद्दल अनेकांनी पापाराझींना सुनावलं.

पहा व्हिडीओ

बॉलिवूड डेब्युसोबतच शहनाज तिच्या खासगी आयुष्यामुळेही खूप चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून राघव जुयाल आणि शहनाज यांच्या डेटिंगच्या जोरदार चर्चा आहेत. इतकंच नव्हे तर हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत, असंही म्हटलं जात होतं. मात्र राघवने शहनाजला डेट करत नसल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

“इंटरनेटवरील गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. जोपर्यंत मी स्वत: ते पाहत नाही किंवा ऐकत नाही, तोपर्यंत ते खरं आहे की खोटं ते मला माहीत नाही. मी इथे चित्रपटासाठी आलो आहे आणि मला लोकांनी एक अभिनेता, डान्सर आणि सूत्रसंचालक म्हणून ओळखावं अशीच माझी इच्छा आहे. मी कामातून व्यक्त होतो. बाकी या सर्व गोष्टी (डेटिंगच्या चर्चा) असो किंवा नसो.. आणि हे सर्व शक्यच नाही. कारण माझ्याकडे तेवढा वेळच नाही. मी डबल शिफ्टमध्ये काम करतो. सध्या माझी परिस्थिती अशी आहे की या सर्व गोष्टींसाठी माझ्याकडे वेळच नाही”, असं तो म्हणाला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.