Shekhar kapoor on Sushant Suicide | तुझ्या दु:खाची मला जाणीव होती, जबाबदार कोण याचीही मला कल्पना : शेखर कपूर
अभिनेते आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांनी ट्विटरवर सुशांतच्या आत्महत्येवर दु:ख व्यक्त केलं आहे (Shekhar kapoor on Sushant Suicide).
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या 34 व्या वर्षी आत्महत्या करुन स्वत:चं जीवन संपवलं. त्याच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, अभिनेते आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांनीदेखील ट्विटरवर सुशांतच्या आत्महत्येवर दु:ख व्यक्त केलं आहे (Shekhar kapoor on Sushant Suicide).
“तू ज्या परिस्थितीतून, तणावातून जात होता त्याची मला जाणीव होती. ज्या लोकांनी तुला कमजोर बनवलं, ज्यांच्यामुळे तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडलास, त्या सर्वांची गोष्ट मला ठावूक आहे. गेल्या सहा महिन्यात तुझ्यासोबत एकत्र राहायला हवं होतं, तू निदान माझ्याशी बातचीत तरी केली असतीस. जे काही झालं, ते सर्व इतरांचे कर्म होते, तुझे नाही”, असं शेखर कपूर ट्विटवर म्हणाले (Shekhar kapoor on Sushant Suicide).
I knew the pain you were going through. I knew the story of the people that let you down so bad that you would weep on my shoulder. I wish Iwas around the last 6 months. I wish you had reached out to me. What happened to you was their Karma. Not yours. #SushantSinghRajput
— Shekhar Kapur (@shekharkapur) June 15, 2020
शेखर कपूर यांचं हे ट्विट विचार करण्यास भाग पाडणारं आहे. कारण सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, बॉलिवूडमधील मोठे दिग्दर्शक त्याच्याकडे पाठ फिरवत असल्याने तो दु:खी होता, अशी चर्चा आहे. मात्र, या गोष्टींचा कुठलाही पुरावा अद्याप समोर आलेला नाही.
शेखर कपूर आणि सुशांत सिंह राजपूतने ‘पाणी’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाची घोषणा ‘कान्स’ फिल्म फेस्टिवलमध्ये करण्यात आलेली.
अभिनेता ऋतिक रोशन सोबत हा चित्रपट करावा, अशी शेखर कपूर यांची इच्छा होती. मात्र, ‘मोहेंजोदडो’ चित्रपटाच्या चित्रिकरणामुळे ऋतिक या प्रोजेक्टचा भाग बनू शकला नाही. याशिवाय शेखर कपूर या चित्रपटासाठी हॉलिवूड स्टारची निवड करणार होते. मात्र, शेवटी त्यांनी सुशांतची निवड केली.
सुशांतने या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत केली, असं शेखर कपूर यांनी सांगितलं होतं. मात्र, या चित्रपटाच्या प्रोजेक्टसाठी यशराज सारख्या मोठ्या बॅनरने नकार दिला तेव्हा सुशांत नाराज झाला.
दरम्यान, सुशांतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर चित्रपट निर्माते करण जोहर, अभिनेत्री आलिया भट यांना ट्रोल केलं जात आहे. सुशांत स्टार किड नसल्याने इंडस्ट्रित त्याला नेपोटिझमचा सामना करावा लागला, असा आरोप लोकांकडून केला जात आहे.
हेही वाचा : Kangana on Sushant Suicide | इंडस्ट्रीतील कंपूशाहीने सुशांतचा बळी घेतला, कंगनाचा बॉलिवूडवर संताप