Raj Kundra | ईशा गुप्ताला पाहताच राज कुंद्राची जीभ घसरली; नेटकरी म्हणाले ‘शिल्पा, आता तरी डोळे उघड’

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. राजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो अभिनेत्री ईशा गुप्ताबद्दल कमेंट करताना दिसतोय.

Raj Kundra | ईशा गुप्ताला पाहताच राज कुंद्राची जीभ घसरली; नेटकरी म्हणाले 'शिल्पा, आता तरी डोळे उघड'
Raj KundraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 19, 2023 | 7:42 PM

मुंबई | 19 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्राने तुरुंगातून जामिनावर सुटल्यापासून पापाराझी किंवा मीडियासमोर कधीच चेहरा दाखवला नाही. राजला नेहमीच वेगवेगळ्या मास्कमध्ये पाहिलं गेलं. नुकताच शिल्पाच्या घरात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गणपती बाप्पाचं आगमन केलं. यावेळीही राज कुंद्राने त्याचा चेहरा पूर्णपणे झाकला होता. त्यावरून त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा राज कुंद्राचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने अभिनेत्री ईशा गुप्ताबद्दल कमेंट केली आहे. त्याच्या याच कमेंटवरून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

अभिनेत्री करीना कपूरच्या ‘जाने जान’ या चित्रपटाचा प्रीमिअर नुकताच पार पडला. या प्रीमिअरला ईशा गुप्तानेही हजेरी लावली होती. यावेळी ती पापाराझींसमोर उभी राहून फोटोसाठी पोझ देत असते. इतक्यात राज कुंद्रा तिच्याजवळ जातो आणि तिला मिठी मारतो. इतकंच नव्हे तर राज कुंद्रा तिला म्हणतो, “ओह माय गॉड, यु आर सो हॉट, यु आर सो हॉट”. राजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावरून नेटकरी राजसोबतच शिल्पालाही ट्रोल करत आहेत.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

शिल्पा शेट्टीच्या चाहत्यांना राज कुंद्राचं हे वागणं अजिबात आवडलं नाही. अनेकांनी शिल्पाला सल्ला दिला की तिने आता तरी डोळे उघडले पाहिजेत. ‘हे देवा, शिल्पा मॅडम आता तरी जागी हो’, असं एकाने लिहिलं. तर ‘हा माणूस कधीच सुधारणार नाही’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. फेब्रुवारी 2021 मध्ये राज कुंद्राला आक्षेपार्ह व्हिडीओ निर्मितीप्रकरणी अटक करण्यात आली होती. राज अश्लील व्हिडीओ बनवण्याचा रॅकेट चालवतो, असा आरोप त्याच्याविरोधात करण्यात आला. काही महिलांनीही त्याच्या विरोधात जबाब नोंदवला होता.

राज कुंद्रा जवळपास महिनाभर तुरुंगात होता. यावेळी शिल्पा त्याला घटस्फोट देण्याचीही जोरदार चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात असं काहीच झालं नाही. शिल्पाने राजची पूर्ण साथ दिली. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतरही शिल्पाने राजचा बचाव केला. राजवर केलेले सर्व आरोप खोटे आहेत, असं ती म्हणाली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.