Video | शिल्पा शेट्टी प्रचंड ट्रोल, ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरस, लोक थेट म्हणाले, हेच खरे चेहरे…
शिल्पा शेट्टी हिने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. शिल्पा शेट्टी हिची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
मुंबई : शिल्पा शेट्टी हिने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शिल्पा शेट्टी हिने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे हे केले. शिल्पा शेट्टी हिने थेट म्हटले की, मला कधीच बाॅलिवूडच्या (Bollywood) टाॅप 10 अभिनेत्रींमध्ये घेतले गेले नाही. शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते.
शिल्पा शेट्टी ही आपल्या फिटनेसवर प्रचंड लक्ष देताना दिसते. शिल्पा शेट्टी हिचा पती हा लवकरच बाॅलिवूड चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटाची स्टोरी ही राज कुंद्रा याच्यावरच आधारित असून तोच या चित्रपटामध्ये अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला.
राज कुंद्रा याच्यावर काही दिवसांपूर्वी अत्यंत गंभीर आरोप झाले. इतकेच नाही तर थेट जेलमध्ये राहण्याची वेळ ही राज कुंद्रा याच्यावर आली. राज कुंद्रा याला थेट पाॅर्न किंग देखील म्हटले गेले. राज कुंद्रा याच्यावर होणाऱ्या आरोपांनंतर लोकांनी थेट काही दिवस शिल्पा शेट्टी हिच्यावर टिका करण्यास देखील सुरूवात केली.
पाॅर्न प्रकरणात नाव आल्यापासून सतत राज कुंद्रा हा मास्क घालून बाहेर स्पाॅट झालाय. विशेष म्हणजे या मास्कमध्ये राज कुंद्रा याचा चेहरा हा अजिबातच दिसत नाही. गेल्या दोन वर्षांपासून राज कुंद्रा हा सतत मास्कमध्ये फिरताना दिसतोय. यामुळेच अनेकदा राज कुंद्रा याच्यावर टिका देखील करण्यात आलीये.
View this post on Instagram
विशेष म्हणजे राज कुंद्रा हा शिल्पा शेट्टी ही सोबत असताना देखील चेहराचा मास्क काढत नाही. आता नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये चक्क राज कुंद्रा याच्यासोबत शिल्पा शेट्टी हिने देखील आपल्या चेहऱ्यावर मास्क लावल्याचे दिसतंय. काळ्या रंगाच्या मास्कमध्ये शिल्पा दिसतंय.
शिल्पा आणि राज यांनी एकसारखे मास्क लावले आहेत. शिल्पा आणि राज कुंद्रा यांचा हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. पापाराझी यांना पाहून शिल्पा शेट्टी ही थोडासा चेहरा दाखवताना दिसतंय. या व्हिडीओमुळे यांना खडेबोल सुनावले जात आहेत. एकाने लिहिले की, चुकीची कामे केली की तोंड लपवण्याची वेळ येते. दुसऱ्याने लिहिले की, हाच यांचा खरा चेहरा आहे.