Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 | शिव ठाकरेची जादू झाली कमी; कुठे बिघडला खेळ? ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीतून पडणार बाहेर?

बिग बॉस मराठी 2 चा विजेता ठरलेला शिव आता बिग बॉस 16 ची ट्रॉफी जिंकण्यापासून दूर जात असल्याचं दिसतंय. त्यामुळे गेल्या एक महिन्यात असं काय घडलं, ज्यामुळे शिव ठाकरेला फटका बसला आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Bigg Boss 16 | शिव ठाकरेची जादू झाली कमी; कुठे बिघडला खेळ? ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीतून पडणार बाहेर?
Shiv ThakareImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 2:18 PM

मुंबई: बिग बॉसच्या सोळाव्या सिझनचा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सिझनच्या मध्यापर्यंत शिव ठाकरेची जोरदार चर्चा होती. तोच विजेता ठरणार असं म्हटलं जात होतं. मात्र जसजसा फिनाले जवळ येऊ लागला, तसतसे अंदाज बदलू लागले आहेत. आता शिव ठाकरेला प्रियांका चहर चौधरीकडून चांगलीच टक्कर मिळतेय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सोशल मीडियावरील ट्रेंड पाहता प्रियांकाच या सिझनची विजेती ठरणार असं दिसतंय. बिग बॉस मराठी 2 चा विजेता ठरलेला शिव आता बिग बॉस 16 ची ट्रॉफी जिंकण्यापासून दूर जात असल्याचं दिसतंय. त्यामुळे गेल्या एक महिन्यात असं काय घडलं, ज्यामुळे शिव ठाकरेला फटका बसला आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

ग्रुपचा भाग बनल्याने शिवला मोठा फटका?

बिग बॉस 16 मध्ये जेव्हा शिव ठाकरेने एण्ट्री केली, तेव्हापासून तो साजिद खानसोबत होता. नंतर हळूहळू साजिद आणि शिवने आपला ग्रुप बनवला. या ग्रुपमध्ये शिव इतक्या चांगल्या पद्धतीने रमलाय की आता सिझन संपत येत असतानाही त्यालाच ग्रुपचं ओझं उचलावं लागत आहे. ग्रुपचा भाग झाल्याने शिव संपूर्ण सिझनमध्ये एकट्याची वेगळी कामगिरी दाखवू शकला नाही.

अनेकांनी शिव ठाकरेला यावरून सुनावलं, मात्र त्याने आपला खेळ बदलला नाही. त्यामुळे ग्रुपमध्ये राहून शिवची आपली स्वत:ची खेळी बाजूला सारली गेली. आता त्याचा कोणताच गेम प्लॅन दिसून येत नाही. बिग बॉसच्या घरात जो एकटा लढतो, तोच प्रेक्षकांना सर्वाधिक आवडतो. त्यामुळे यंदाच्या सिझनमध्ये प्रेक्षकांना शिवची ही खेळी विशेष पटली नाही.

हे सुद्धा वाचा

स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यात अपयशी

साजिद खान आणि अब्दु रोझिक असताना शिवला प्रसिद्धी मिळत गेली. मात्र ते दोघं गेल्यापासून शिव आणखी कमकुवत झाला. आता प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्याला ओढून ताणून वाद करावा लागतो. अनेकदा तो एमसी स्टॅनसोबत एका कोपऱ्यात शांत बसतो.

शिव ठाकरेचा गेम प्लॅन जवळून पाहणाऱ्यांना हे माहीत असेल की पहिल्या दिवसापासून त्याचा घरात कोणता ठराविक मुद्दा नव्हता. कधी तो साजिदच्या तर कधी अब्दुच्या मुद्द्यांचा भाग बनायचा. या दोघांना सोडून इतर स्पर्धकांसोबत त्याची खास मैत्री होताना दिसली नाही. कदाचित याच गोष्टीमुळे शिव मागे पडताना दिसत आहे.

जिंकण्याचा उत्साह झाला कमी

शिव ठाकरे जेव्हा शोमध्ये आला तेव्हा बिग बॉस मराठीप्रमाणेच या सिझनचीही ट्रॉफी आपल्या नावावर करण्याचा उत्साह त्याच्यात दिसला होता. मात्र नंतर हळूहळू त्याचा हा उत्साह कमी झाल्याचं पहायला मिळालं. ग्रँड फिनालेच्या आठवड्यात त्याची परिस्थिती आणखी वाईट झाली आहे. प्रियांकाच विजेती ठरणार ही बाब त्यानेसुद्धा स्वीकारली असल्याचं दिसतंय.

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.