शिवानीने लावला अरमान मलिकच्या दोन्ही पत्नींवर गंभीर आरोप, म्हणाली, यांच्या घरी…
बिग बॉस ओटीटी 3 चांगलेच चर्चेत आहेत. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये धमाके होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसमध्ये सहभागी झाला होता. आता पायल मलिक ही बिग बॉसमधून बाहेर पडलीये. आता शिवानीने काही गंभीर आरोप केले आहेत.
बिग बॉस ओटीटी 3 धमाका करताना दिसत आहे. बिग बॉस ओटीटी 3 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ देखील बघायला मिळतंय. विशेष म्हणजे बिग बॉस ओटीटी 3 मध्ये अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत सहभागी झाला होता. मात्र, पायल मलिक ही आता बेघर झालीये. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये अरमान आणि कृतिका आहेत. विशेष म्हणजे सर्वात चर्चेत यंदा बिग बॉसमध्ये मलिक कुटुंबच आहे. बिग बॉसच्या घरात जोरदार हंगामे बघायला मिळत आहेत. पायल ही बेघर झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अनेकांनी बिग बॉसच्या निर्मात्यांवर टीका देखील केली.
दुसरीकडे शिवानी ही देखील बिग बॉसमधील चर्चेत असलेले नाव आहे. शिवानीच्या निशाण्यावर अरमान मलिक आणि कृतिका आहेत. हेच नाही तर अनिल कपूर यांनी गेल्याच विकेंडच्या वारमध्ये शिवानीला खडेबोल सुनावले होते. घरातील अनेक सदस्य हे शिवानीची तक्रार करताना दिसले. प्रत्येकवेळी शिवानी घरातील सदस्यांना भांडताना दिसते.
आता नुकताच शिवानी हिने अरमान मलिकच्या दोन्ही पत्नींवर आरोप केला आहे. शिवानीचे बोलणे ऐकून लोक हैराण झाले. शिवानी ही सना मकबूल आणि वडापाव गर्लला म्हणते की, या लोकांना वाटते की, मी छोट्या गावातील आहे. माझ्या घरी काहीच नाही. मी जेंव्हा यांच्या घरी गेले होते, त्यावेळी दोन्ही वहिणी म्हणाल्या की, जेवण टाका हिला.
पुढे शिवानी म्हणते, जर तुमच्या घरी आले तर तुम्ही असेल म्हणाल का? या गोष्टी माझ्या मनाला खूप जास्त लागल्या आहेत. यावेळी सना आणि वडापाव गर्ल शिवानीला सांभाळताना दिसतात. मात्र, शिवानी हिने केलेल्या या दाव्यानंतर मलिक कुटुंबियांपैकी कोणीही काहीही भाष्य केले नाहीये. शिवानी सतत मलिक कुटुंबाच्या विरोधात बोलताना दिसत आहे.
हेच नाही तर एक इच्छा मागण्यास घरातील सदस्यांना बिग बॉसने सांगितले होते. त्यावेळी चक्क शिवानी म्हणते की, अरमान भाईला घरातून काढून टाका. यावेळी बिग बॉस म्हणतात की, हा अधिकार तुला किंवा मला नाहीये. हा अधिकार फक्त जनतेला आहे. यावरून हे कळते की, मलिक कुटुंबावर शिवानी ही किती जास्त नाराज आहे. शिवानीची सोशल मीडियावर जोरदार फॅन फॉलोइंग बघायला मिळते.