अंबानी यांच्या मोठ्या सूनेची बहीण दिसते प्रचंड ग्लॅमरस; Diya Mehta हिच्या सौंदर्याच्या सर्वत्र चर्चा

मुकेश अंबानी यांची मोठी सून श्लोका अंबानी यांची बहीण दिसते प्रचंड सुंदर; तिच्या सौंदर्यापुढे अभिनेत्री देखील फेल....सर्वत्र तिच्या फोटोंचीच चर्चा...

अंबानी यांच्या मोठ्या सूनेची बहीण दिसते प्रचंड ग्लॅमरस; Diya Mehta हिच्या सौंदर्याच्या सर्वत्र चर्चा
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 11:43 AM

मुंबई : देशातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि पत्नी नीता अंबानी यांची चर्चा चाहत्यांनमध्ये कायम रंगत असते. एवढंच नाही तर, अंबानी कुटुंबातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. नुकताच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर ( NMACC) कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हजेरी लावली. शाहरुख खान, सलमान खान, ऐश्वर्या राय आणि आलिया भट्ट यांच्यासोबतच टॉम हॉलैंड, जेंडाया आणि जीजी हदीद या हॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील अंबानी यांच्या कार्यक्रमात हजेरी लावली. अशात अंबानी कुटुंबाच्या सदस्यांवर अनेकांच्या नजरा येवून थांबल्या.

अंबानी कुटुंबातील मोठी सून श्लोका मेहता कार्यक्रमात त्यांच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आल्या. कार्यक्रमादरम्यान श्लोका बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसल्या. NMACC श्लोका मेहता यांच्यासोबतच बहीण दिया मेहता जातिया (Diya Mehta Jatia) देखील तुफान चर्चेत आली. सध्या सर्वत्र श्लोका मेहता यांची बहीण दिया मेहता हिचीच चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

श्लोका मेहता यांची बहीण यांची बहीण (Shloka Mehta Sister) दिया मेहता जातिया (Diya Mehta Jatia) देखील अंबानींच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होती. सेलिब्रिटी आणि अंबानी कुटुंबामुळे दिया दिसली नसली तरी, सोशल मीडियावर मात्र तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

View this post on Instagram

A post shared by Diya Mehta Jatia (@dmjatia)

NMACC च्या पहिल्या दिवशी दिया मेहता पारंपरिक लूकमध्ये दिसली. खुद्द दियाने तिचे काही फोटो इन्स्टाग्राम शेअर केले आहेत. सध्या सर्वत्र दिया हिच्याच फोटोंची चर्चा आहे. फोटो पोस्ट करत दियाने कॅप्शनमध्ये, ‘जेव्हा उत्तम कपडे निवडण्याची वेळ येते, तेव्हा मी कोण आहे.. हे दाखवण्याचा सतत विचार करत असते…’ असं लिहिलं आहे.

दिया मेहता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, २०१७ मध्ये दियाने हार्डकॅसल रेस्टोरेंट्सचे एमडी आयुष जातिया (Ayush Jatia) यांच्यासोबत लग्न केलं आहे. दिया दोन मुलांची आई देखील आहे. महत्त्वाचं म्हणजे दिया मेहता आणि ईशा अंबानी (Isha Ambani) लहानपणापासून चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघींचं शिक्षण एकाच वर्गात झालं आहे. सध्या सर्वत्र दिया हिच्या सौंदर्याची चर्चाच आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.