Dipika Kakar | डिलिव्हरीनंतरही बाळापासून दूर का आहे दीपिका कक्कर? अभिनेत्रीने दिले तब्येतीचे अपडेट्स
बाळाला लवकरात लवकर घरी नेऊ शकू, अशी अपेक्षा दीपिकाने यावेळी व्यक्त केली. त्याचसोबत दीपिकाने हेसुद्धा सांगितलं की तिच्या बाळाचा जन्म आठव्या महिन्यात झाला. बाळाच्या डिलिव्हरीची तारीख जुलै महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात होणार होती.
मुंबई : ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील लोकप्रिय जोडी म्हणजेच अभिनेता शोएब इब्राहिम आणि अभिनेत्री दीपिका कक्कर नुकतेच आई-बाबा झाले. 21 जून रोजी दीपिकाने गोंडस बाळाला जन्म दिला. शोएबने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे चाहत्यांना ही ‘गुड न्यूज’ सांगितली होती. मात्र बाळाचा जन्म प्रीमॅच्युअर झाल्याचंही त्याने यावेळी स्पष्ट केलं. बाळाच्या जन्मानंतर अजून त्याला भेटू शकली नाही, असं नुकतंच दीपिकाने सांगितलं. डिलिव्हरी झाल्यापासून दीपिका तिच्या बाळापासून दूरच आहे. त्याचसोबत दीपिकाने तिच्या तब्येतीविषयीची माहिती चाहत्यांना दिली. युट्यूबवरील नव्या व्लॉगमध्ये हे दोघं एकत्र दिसले होते.
या व्लॉगमध्ये दीपिका तिच्या पोस्ट प्रेग्नंसीबाबत मोकळेपणे व्यक्त झाली. त्याचप्रमाणे आता तिची तब्येत आधीपेक्षा बरी असल्याचंही तिने स्पष्ट केलं. प्रीमॅच्युअर डिलिव्हरीमुळे दीपिकाचं सी-सेक्शन झालं होतं. डिलिव्हरीच्या तारखेआधीच बाळाचा जन्म झाल्याने त्याची अधिक काळजी घ्यावी लागत आहे. म्हणूनच दीपिका अद्याप तिच्या बाळाला भेटू शकली नाही. डॉक्टरांनी दीपिका आणि तिच्या पतीला दिवसातून दोन वेळा बाळाला भेटण्याची परवानगी दिली आहे. सध्या बाळाची देखभाल डॉक्टर करत आहेत.
View this post on Instagram
बाळाला लवकरात लवकर घरी नेऊ शकू, अशी अपेक्षा दीपिकाने यावेळी व्यक्त केली. त्याचसोबत दीपिकाने हेसुद्धा सांगितलं की तिच्या बाळाचा जन्म आठव्या महिन्यात झाला. बाळाच्या डिलिव्हरीची तारीख जुलै महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात होणार होती. या वर्षी जानेवारी महिन्यात दीपिकाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. गरोदरपणातील या काळात दीपिकाने विविध पोस्ट आणि व्हिडीओद्वारे चाहत्यांशी संपर्क साधला होता. दीपिका आणि शोएबने ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2018 मध्ये त्यांनी लग्न केलं.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने प्रेग्नन्सी आणि अभिनयक्षेत्राला रामराम करण्याविषयी वक्तव्य केलं होतं. याविषयी पती शोएबशीही चर्चा केल्याचं तिने सांगितलं. “मी गरोदरपणाच्या या टप्प्याचा फार आनंद घेतेय. शोएब आणि माझी उत्सुकता वेगळ्याच पातळीवर आहे. मी फार कमी वयात कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर सलग 10 ते 15 वर्षे मी काम केलं. गरोदर झाल्यानंतर मी शोएबला सांगितलं होतं की मला अभिनयक्षेत्र सोडायचं आहे. मला एक गृहिणी आणि आई म्हणून पुढचं आयुष्य जगायचं आहे”, असं ती म्हणाली.