वाढदिवसानंतर लोकप्रिय कॉमेडियनने घेतला अखेरचा श्वास, 32 व्या वर्षी निधन

Shocking : लोकप्रिय कॉमेडियनने वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, निधनाचा कारण..., निधनाच्या काही दिवसांपूर्वी कॉमेडियनने साजरा केला होता स्वतःचा वाढदिवस... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कॉमेडियनची चर्चा...

वाढदिवसानंतर लोकप्रिय कॉमेडियनने घेतला अखेरचा श्वास, 32 व्या वर्षी निधन
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 8:05 AM

मुंबई | 25 डिसेंबर 2023 : यंदाच्या वर्षी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींचं निधन झालं आहे. आता वर्ष संपायला काही दिवस शिल्लक असताना एका लोकप्रिय कॉमेडियनने अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 32 व्या वर्षी कॉमेडियनचं निधन झालं आहे. म्हणून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कॉमेडियनच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रसिद्ध कॉमेडियन नील नंदा याने वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे.

कमी वयात प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवल्यानंतर नील नंदा इतक्या लवकर जगाचा निरोप घेईल असे कुणालाही वाटलं नव्हतं. नील नंदा याच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. नील नंदा याच्या निधनानंतर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नील नंदा याच्या निधनाची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Neel Nanda (@neelnanda)

नील नंदा याच्याबद्दल सांगायचं झालं तर, नील अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहत होता. नील ‘जिमी किमेल लाइव्ह!’ आणि ‘कॉमेडी सेंट्रल’साठी ओळखला जात होता. नील हा लॉस एंजेलिसमध्ये राहणारा भारतीय होता. त्याना लहानपणापासूनच कॉमेडीची आवड होती. निल याने त्याची आवड जपली आणि प्रसिद्धी मिळवली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी नील याचे मॅनेजर ग्रेग वाईज यांनी चाहत्यांना कॉमेडियनच्या मृत्यूची माहिती दिली. नील याचे मॅनेजर म्हणाले, ‘मी अत्यंत दुःखाने सांगतो की, माझे 11 वर्षांचे क्लायंट नील नंदा यांचं निधन झालं आहे.’ नील नंदा याच्या निधनाने चाहत्यांच्या आणि कुटुंबियांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

नीलच्या निधनानंतर चाहते शोक करत आहेत. नीलच्या अनेक क्लब आणि मित्रांनीही सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. कॉमेडियनच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार नील नंदा यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा 32 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला होता.

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.