Shraddha Kapoor | जेव्हा फरहान अख्तरच्या घरी अशा अवस्थेत दिसली श्रद्धा कपूर; वडिलांनी उचललं मोठं पाऊल

Shraddha Kapoor | लेकीला फरहान अख्तरच्या घरी अशा अवस्थेत पाहून संतापलेल्या शक्ती कपूर यांनी असं काय केलं, ज्यामुळे श्रद्धा कपूर हिच्यावर आली वाईट वेळ

Shraddha Kapoor | जेव्हा फरहान अख्तरच्या घरी अशा अवस्थेत दिसली श्रद्धा कपूर; वडिलांनी उचललं मोठं पाऊल
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 12:07 PM

मुंबई : 8 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री श्रद्धा कपूर बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. पण अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून एकाही वादग्रस्त परिस्थितीत अडकलेली नाही. श्रद्धा कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. पण एक काळ असा होता, जेव्हा श्रद्धा तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती. श्रद्धा कपूर हिचं नाव आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं, पण अभिनेता फरहान अख्तर याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे श्रद्धा कपूर वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. फरहान अख्तर याच्यासोबत असलेलं श्रद्धा हिचं नातं अभिनेत्रीच्या कुटुंबियांना मान्य नव्हतं. रिपोर्टनुसार, एकेकाळी श्रद्धा आणि फरहान सिक्रेट रिलेशनशिपमध्ये होते. पण एका धक्कादायक प्रसंगानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉक ऑन २’ सिनेमानंतर फरहान आणि श्रद्धा यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. रिपोर्टनुसार, सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असं देखील अनेकदा समोर आलं. याचदरम्यान, फरहान याला भेटण्यासाठी श्रद्धा त्याच्या घरी पोहोचली होती.

फरहान याच्या घरी श्रद्धा असल्याचं माहिती होताच अभिनेत्रीचे वडील आणि अभिनेते शक्ती कपूर फरहान याच्या घरी गेले. तेव्हा श्रद्धा आणि फरहान यांना एकत्र पाहिल्यानंतर संतापलेल्या शक्ती कपूर यांनी श्रद्धा हिचा हात धरून तिला अभिनेत्याच्या घरातून बाहेर काढलं. तेव्हा परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून श्रद्धाने देखील काहीही न बोलता वडिलांसोबत स्वतःच्या घरी परतण्याचा निर्णय घेतला.

शक्ती कपूर यांनी मोठं वक्यव्य केलं होतं. ‘हे पूर्णपणे खोटं आहे. रंगणाऱ्या चर्चा फक्त आणि फक्त अफवा आहेत…’ असं वक्तव्य शक्ती कपूर यांनी केलं. त्यानंतर श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर कधीही एकत्र दिसले नाहीत.

श्रद्धा कपूर हिचे सिनेमे

श्रद्धा कपूर हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने करियरची सुरुवात ‘तीन पत्ती’ सिनेमातून केली. पण अभिनेत्रीला यश मिळालं नाही. पण ‘आशिकी २’ सिनेमातून अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली. त्यानंतर श्रद्धा हिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. श्रद्धा हिच्या‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाने देखील बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.