Shraddha Kapoor | शक्ती कपूर नाही ‘हे’ आहे श्रद्धा कपूर हिच्या वडिलांचं खरं नाव

Shraddha Kapoor | श्रद्धा कपूर हिच्या वडिलांचं खरं नाव जाणून तुम्हाला देखील बसेल धक्का; फार कमी चाहत्यांना माहिती आहे सत्य... सर्वत्र अभिनेत्रीच्या वडिलांची चर्चा...

Shraddha Kapoor | शक्ती कपूर नाही 'हे' आहे श्रद्धा कपूर हिच्या वडिलांचं खरं नाव
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 1:50 PM

मुंबई : 9 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या सिनेमांमुळे नाही तर, स्वभाव आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. श्रद्धा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. श्रद्धा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांमध्ये कायम श्रद्धा हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा रंगलेल्या असतात. श्रद्धा अभिनेते शक्ती कपूर यांची मुलगी असल्यामुळे देखील अभिनेत्री कायम चर्चेत असते. अनेक मुलाखतींमध्ये श्रद्धा कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी सांगत असते. पण अभिनेत्रीच्या वडिलांचं खरं नाव फार कमी लोकांना माहिती आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर तिचे वडील शक्ती कपूर यांच्यामुळे देखील कायम चर्चेत असते. अभिनेत्रीचा जन्म पंजाबी हिंदू कुटुंबामध्ये झाला आहे. श्रद्धा हिच्या आजोबांचं दिल्ली याठिकाणी कनॉट प्सेस येथे कपड्यांचं दुकान होतं. शक्ती कपूर यांनी देखील मुलाखतींमध्ये कुटुंबाबद्दल सांगितलं आहे.

शक्ती कपूर यांनी वडिलांचा व्यवसाय न करता मुंबईमध्ये आले आणि बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी जागा निर्माण केली. त्यानंतर शक्ती कपूर यांनी अभिनेत्री शिवांगी कोल्हापुरे यांच्यासोबत लग्न केलं. पण श्रद्धा कपूर हिच्या वडिलांचं खरं नाव फार कमी चाहत्यांना माहिती आहे. तर आज जाणून घेवू शक्ती कपूर यांचं खरं नाव आहे तरी काय?

श्रद्धा कपूर हिचे वडील आणि अभिनेते शक्ती कपूर यांचं खरं नाव सुनील सिकंदरलाल कपूर आहे. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर शक्ती कपूर यांनी स्वतःचं नाव बदललं. सुनील दत्त यांनी शक्ती कपूर यांनी सिनेमात काम करण्याची संधी दिली होती. शक्ती कपूर यांनी स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये भक्कम ओळख निर्माण केली.

सांगायचं झालं तर, श्रद्धा कपूर हिने देखील वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. अभिनेत्रीने करियरची सुरुवात ‘तीन पत्ती’ सिनेमातून केली. पण अभिनेत्रीला यश मिळालं नाही. पण ‘आशिकी २’ सिनेमातून अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली. त्यानंतर श्रद्धा हिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. चाहते देखील श्रद्धा हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.