Shreyas Talpade: आयुष्यातील ‘त्या’ घटनांनी श्रेयसला शिवकला चांगलाच धडा; हात जोडत म्हणाला…

मराठमोळ्या श्रेयस तळपदे याच्यासोबत असं झालं तरी कायम, ज्यामुळे अभिनेत्याने सर्वांसमोर हात जोडत देवाकडे केली अशी प्रार्थना

Shreyas Talpade: आयुष्यातील 'त्या' घटनांनी श्रेयसला शिवकला चांगलाच धडा; हात जोडत म्हणाला...
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 10:51 AM

मुंबई | अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील मोठं नाव. श्रेयसने अनेक मराठी हिंदी सिनेमांत आणि मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्याचं मनोरंजन केलं. श्रेयस फक्त अभिनेता नसून उत्तम दिग्दर्शक देखील आहे. श्रेयसने ‘पोस्टर बॉयज’ आणि ‘पीजी’ सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्याने ‘पुष्मा’ सिनेमातील अल्लू अर्जुनला देखील स्वतःचा आवाज दिला आहे. प्रसिद्ध अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेला श्रेयस ‘द केरळ स्टोरी’ स्टारर अभिनेत्री अदा शर्मा हिच्यासोबत देखील स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. श्रेयस आणि अदा यांच्या आगामी सिनेमाचं नाव ‘द गेम ऑफ गिरगिट’ आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख तर अद्याप समोर आलेली नाही. पण श्रेयसने नुकताच एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य तुफान चर्चेत आलं आहे.

बॉलिवूडमध्ये काम करताना आलेला अनुभव आणि अभिनेत्याने त्यातून घेतलेली शिकवण सध्या तुफान चर्चेत आहे. अभिनेता म्हणाला, ‘इंडस्ट्रीमध्ये मला कोणी कधी प्राथमिकता दिली नाही.. इतरांनी नाकारलेल्या गोष्टी माझ्या नशीबात आल्या. मी तर देवाकडे प्रार्थना करतो लोकांनी मला नाकारावं ज्यामुळे अधिक चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात यातील..’

पुढे अभिनेता म्हाणाला, ‘खरं सांगायचं तर मी इक्बाल मध्ये मी सेकेंड चॉइस होतो. गोलमाल रिटर्न्समध्ये मी सेकेंड चॉइस होतो. ओम शांती ओम सिनेमात मी सेकेंड चॉइस होतो… हाउसफूलमध्ये मी सेकेंड चॉइस होतो… काही सिनेमांमध्ये तर मी तिसऱ्या क्रमांकावर होतो..पण मी खूप आनंदी आहे. मी देवाला सांगतो की लोक फक्त नाकारत राहतात आणि त्यानंतर मला अधिक चांगलं मिळतं.’

श्रेयस आज मराठी आणि हिंदी सिनेविश्वातील महत्त्वाच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. पण सिनेविश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अभिनेत्याने अनेक चढ – उतार पाहिले आहेत. पण आज यशाच्या उच्च शिखरावर असलेल्या श्रेयस अनेक नव्या कलाकारांच्या प्रेरणास्थानी आहे. मराठी मालिकांमध्ये देखील श्रेयसने उत्तम कामगिरी बजावली आहे.

सोशल मीडियावर देखील श्रेयस कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. अभिनेत्याच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाप्रमाणेच त्याची लव्हस्टोरी देखील खास आहे. कॉलेजच्या एका फेस्टमध्ये श्रेयसला बोलावण्यात आलं होतं. तेव्हा कॅलेजच्या सेक्रेटरीला म्हणजे दिप्तीला पाहून, पहिल्या नजरेतच श्रेयस दिप्तीच्या प्रेमात पडला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.